घरताज्या घडामोडीपॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगवेलून सलग दुसऱ्यांदा पटकावलं पदक, शरद कुमारची उंच उडीत...

पॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगवेलून सलग दुसऱ्यांदा पटकावलं पदक, शरद कुमारची उंच उडीत कांस्य कमाई

Subscribe

उंच उडीच्या अंतिम फेरित पोहोचलेल्या मरिअप्पन थंगवेलूने पुरुष उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदकाची कमाई

भारतीय खेळाडूंनी सलग तीन दिवस पदकांची कमाई केली आहे. भारताने सोमवारी दुहेरी सुवर्ण पदकांसह पाच पदके पटकावली आहेत. तर मंगळवारी उंच उडीच्या अंतिम फेरित पोहोचलेल्या मरिअप्पन थंगवेलूने पुरुष उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. शरद कुमारने देखील या प्रकारात तिसरे स्थान मिळवत भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी सुरु ठेवली आहे.

भारतीय खेळाडू मरिअप्पनने मागील वर्षी रिओ पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी टी-४२ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तर यंदा टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून सर्व देशवासीयांची मने जिंकली आहेत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यामुळे भारताने पदतालिकेत दुहेरी अंक गाठला आहे. मरिअप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांच्या पदकांमुळे भारताची पदतालिका १० अशी झाली आहे. यामध्ये भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकं पटकावली आहेत.

- Advertisement -

शरद कुमारची कांस्य कमाई

भारतीय खेळाडू शरद कुमार याने सुरुवातीला १.८३ मीटरची उंच उडी घेत आघाडी घेतली होती. यानंतर १.८६ मीटरची उडी घेण्यात शरद कुमार अपयशी ठरला. अमेरिकेच्या ग्रीव सॅम आणि भारताच्या मरिअप्पन यांच्यात १.८६ मीटरचा मार्क गाठण्याची स्पर्धा होती. मरियप्पन तिन्ही प्रयत्नात १.८६ मीटरचा मार्क गाठू शकला नाही. मात्र अमेरिकेच्या ग्रीवने तिसऱ्या प्रयत्नात मार्क गाठला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर मरिअप्पनला रौप्य तर शरद कुमारने कांस्य पदक जिंकलं आहे.


हेही वाचा : PKL Auction 2021: प्रदीप नरवाल ठरला सर्वात महागडा खेळाडू

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -