घरअर्थजगतकोरोना महामारीत लोकांचा LIC वरील विश्वास वाढला; ५ महिन्यात १५ हजारांहून अधिक...

कोरोना महामारीत लोकांचा LIC वरील विश्वास वाढला; ५ महिन्यात १५ हजारांहून अधिक पॉलिसी वाढल्या

Subscribe

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, प्रत्येक क्षेत्रावर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. असे असताना मात्र कोरोना महामारी दरम्यान, लोकांचा LIC विम्यावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर विभागात गेल्या वर्षी २०२० च्या एप्रिल ते ऑगस्टच्या तुलनेत, यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान १५ हजारांहून अधिक विमा पॉलिसी वाढल्या आहेत. यासह, विमा प्रीमियम देखील ११ कोटींहून अधिक वाढला असल्याचे सांगितले जात आहे. एलआयसी नेहमी आपल्या ग्राहकांची काळजी घेते आणि त्यांच्यासाठी चांगल्या विमा पॉलिसी तयार करत राहते. यामुळे खाजगी कंपन्यांच्या तुलनेत एलआयसीवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे एका विमा अधिकाऱ्याने सांगितले.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० पासून ऑगस्ट २०२० दरम्यान ४१ हजार ६३१ पॉलिसी ग्राहकांकडून काढण्यात आल्यात, त्यामुळे ३२ कोटी ३६ लाख रूपयांचा फायदा झाला तर यंदाच्या वर्षी एप्रिल २०२१ पासून ऑगस्ट २०२१ या काळात पॉलिसीची संख्या वाढून ती ५६ हजारांच्या पुढे गेली असून त्यातून एलआयसीला ४२ कोटी २६ लाखांचा लाभ झाला. अशा प्रकारे, विमा पॉलिसींमध्ये ३६.२८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर विम्याच्या प्रीमियममध्ये ३०.९५ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सामान्य दिवसांमध्ये अशी कोणतीही वाढ होताना दिसत नाही जी कोरोना महामारीमध्ये झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चा बुधवार १ सप्टेंबर हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, LIC Foundation Day निमित्ताने बुधवारपासून विमा सप्ताह साजरा होत आहे. या आठवड्यात ग्राहकांच्या सोयीसाठी विशेष काउंटरही उभारण्यात येत आहेत. या काउंटरमध्ये सर्व सेवा ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. कोरोना काळात विमा पॉलिसी आणि विमा प्रीमियम दोन्ही वाढल्याचे सांगितले जात आहे. यामुळे निश्चितपणे असे म्हणता येईल की एलआयसीवरील लोकांचा विश्वास दृढ झाला असल्याचे एलआयसी कडून सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -