घरताज्या घडामोडीWeather Update: महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, घाट माथ्यावर २०० मिमीपेक्षा जास्त...

Weather Update: महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, घाट माथ्यावर २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

Subscribe

राजधानी दिल्ली-एनसीआरसह देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, विदर्भ, तामिळनाडू, गुजरात, पद्दुचेरी, केरळ आणि माहेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या दिवसांत देखील अशाच प्रकारची परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन-चार दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याने काही राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआर, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओडिसा सारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय येत्या चार-पाच दिवसांमध्ये कोकण, गोवा, गुजरात, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ, ओडिसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दिल्लीमध्ये पुढील सात दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून येत्या दिवसांत महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास खूप महत्त्वाचे आहे. बंगाल उपसागरात कमी ताबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यातील घाट माथ्यावरती २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबईतील काही भागांमध्ये पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग सुरू आहेत. आज, सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर कायम आहे. सध्या मुंबईत पावसाचा जोर वाढल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे.

या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी

आयएमडीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisement -

मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणं भरली

पावसाचा जोर कायम असल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणं भरली आहेत. कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडले असून कोयनेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील ऐतिहासिक ब्रिटीशकालीन भाटघर धरण शंभर टक्के भरलं आहे.


हेही वाचा – Weather Updates: देशातील काही भागांमध्ये IMDने पुन्हा अलर्ट केला जारी; महाराष्ट्रातील या भागांमध्ये पावसाचा जोर कायम


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -