घरताज्या घडामोडीखूश खबर, डेंग्यूवर प्रभावी औषध शोधण्यात भारतीय संशोधकांना यश

खूश खबर, डेंग्यूवर प्रभावी औषध शोधण्यात भारतीय संशोधकांना यश

Subscribe

लखनौ येथील केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थानच्या ( सीएसआयआर-सीडीआरआय़) संशोधकांना डेंग्यूवर दोन प्रभावी औषध शोधून काढण्यात यश मिळाले आहे.

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असतानाच भारतामध्ये कोरोनाबरोबरच डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. यामुळे तज्त्रांनीही याबदद्ल चिंता व्यक्त केली आहे. मात्र याचदरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लखनौ येथील केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थानच्या ( सीएसआयआर-सीडीआरआय़) संशोधकांना डेंग्यूवर दोन प्रभावी औषध शोधून काढण्यात यश मिळाले आहे. प्राथमिक चाचणीत संशोधकांनी दोन उंदरांवर संशोधन केले. त्यात त्यांना यश मिळाले असून लवकरच मानवावर चाचणी करण्यात येणार आहे.

तज्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. सुरुवातीला डेंग्यूचा ताप सामान्य जरी वाटत असला तरी योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. सध्या कोरोनाकाळात डेंग्यूचाही धोका वाढला आहे. देशात कोरोना रुग्णांबरोबरच डेंग्यूचेही रुग्ण वाढत आहेत. यामुळे लखनौच्या केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थानने उंदरावर दोन औषधांचा यशस्वी प्रयोग केला. आता लवकरच मानवावर त्याचा प्रयोग केला जाणार असून त्यात हमखास यश मिळणार आहे. त्यानंतर त्याचे पेटेंट केले जाईल. नंतर बाजारात ही औषधे विक्रीसाठी उपलब्ध असतील. अशी माहिती सीडीआरआयचे प्रमुख प्राध्यापक तपस कुंडू यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भारतात दरवर्षी डेंग्यूने शेकडो जण दगावतात . कारण अद्यापही संशोधकांना डेंग्यूवर प्रभावी असे औषध सापडले नव्हते. फक्त त्याच्या लक्षणे बघून रुग्णांवर इलाज केला जात होता. पण लखनौमधील संशोधकांनी डेंग्यूवर औषध तयार केल्याने डेंग्यूचा लवकरच नायनाट होईल अशी प्रतिक्रिया संशोधकांनी दिली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -