घरमनोरंजनआयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सोनू सूदने सोडले मौन म्हणाला, माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया...

आयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सोनू सूदने सोडले मौन म्हणाला, माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया…

Subscribe

सोनू सूदने देखील त्याच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर एक स्टेटमेंट जाहीर करत आपल्या मानतील भावना प्रकट केल्या आहेत.

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता सोनू सूदच्या(sonu sood) घरावर तसेच ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी आयकर विभागाचे सर्वेक्षण केले असून आयकर विभागाने(Income Tax Department) सोनूवर कोट्यवधी रुपयांचे टॅक्स चोरी केल्याचा आरोप लावला आहे. सर्वेक्षण दरम्यानअनेक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने यासंबधीत एक प्रेस रिलीज जाहीर करुन सर्व माहिती शेअर केली होती. आता यानंतर अभिनेता सोनू सूदने देखील त्याच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर एक स्टेटमेंट जाहीर करत आपल्या मानतील भावना प्रकट केल्या आहेत.(Sonu Sood, under scrutiny for tax evasion, breaks silence)

सोनूने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, आपल्याला नेहमीच आपली बाजू सांगण्याची गरज नाही. वेळच सांगेल. मी भारताच्या लोकांच्या सेवेसाठी स्वतःला माझ्या मनापासून आणि शक्तीने समर्पित केले आहे. माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया एक जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी वाट पाहत आहे. तसेच, अनेक प्रसंगी मी ब्रॅण्डना मला मिळणारी रक्कम काही सामाजिक कामांना देण्यास सांगितली. सोनू पुढे म्हणाला की, गेल्या चार दिवसांपासून मी काही पाहुण्यांच्या पाहुणाचार करण्यात व्यस्त होतो, त्यामुळे मी तुमच्या मदतीला हजर राहू शकलो नाही. मी संपूर्ण विनम्रतेने परतलो आहे. तुमच्या सेवेसाठी आयुष्यभर.

पोस्ट पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण-

15 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनूच्या सर्व कार्यालयात तसेच घरामध्ये सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असून हे सर्वेक्षण तब्बल 4 दिवसू सुरू होते. आयकर विभागाने जारी केलेल्या प्रसे रिलजच्या माहितीनुसार, मुंबई, लखनऊ, कानपुर, दिल्ली, जयपुर आणि गुरूग्राममध्ये सोनू सुदशी निगडीत 28 जागेवर सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी सोनू आणि त्च्या सहयोगिच्या घरी आणि कार्यालयाची तपासणी करण्यात आली आणि टॅक्स चोरी केल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस ३’ च्या घरात राजकीय नेत्यांपासून ते किर्तनकारांची एंट्री, पाहा १५ स्पर्धकांची ओळख

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -