घरताज्या घडामोडीबदनामी करण्याचा विरोधकांचा राजकीय धंदा, मानहानीच्या दाव्यावरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

बदनामी करण्याचा विरोधकांचा राजकीय धंदा, मानहानीच्या दाव्यावरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena sanjay raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरुद्ध सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी किंमत वाढवी असे म्हटलं आहे. संजय राऊतांची किंमत एवढी नाही असेही पाटील यांनी म्हटलं होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही. मानहानीचा दावा स्वाभिमानासाठी असतो. विरोधक राजकीय दृष्ट्या आरोप करत असून हा त्यांचा राजकीय धंदा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या घोटाळ्यांबाबत योग्य वेळी सगळ काढू असा इशाराच भाजप नेत्यांना दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांना मानहानीची किंमत वाढवण्याबाबतचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले असल्याचे सांगितले. यावर राऊत म्हणाले की, प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. प्रश्न स्वाभिमानाचा असतो. अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही. हजार कोटी, ५०० कोटी ती एक लढाई असते. तुम्ही खोटं बोलात, तुमच्याकडे माहिती नाही. तुम्ही जाणीवपुर्वक बदनामी करत आहात. तुमचा तो राजकीय धंदा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब द्यायला लागेल. रुपया, सव्वाकोटी हे रुपये फक्त आकडे दाखवायला असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा, शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. तुम्ही त्यांच्यावर चिखलफेक करु शकत नाही.

- Advertisement -

योग्य वेळी भाजपचे घोटाळे काढू

आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. हा पैसा कुठून आला आम्हाला माहिती आहे. २१ हजार कोटींचे ड्रग्ज कुठे पकडतात त्याचे पैसे कुठे जातात याची सगळी माहिती आम्हाला माहिती आहे. आम्ही वेळ आल्यावर सगळं काढू असा संजय इशारा संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, हरकत नाही, कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तर हे सव्वा रुपया फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेल की, थोडी रक्कम वाढवावी लागेल याचे कारण म्हणजे शेवटी अब्रुनुकसानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती एवढ्या कोटीची आहे. संजय राऊतांची अब्रुनुकसानी एवढ्या रुपयांची नाही आहे. त्यामुळे त्यांनी थोडी रक्कम वाढवावी असा चिमटा चंद्रकांत पाटील यांना काढला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -