घरमुंबईदिलीपकुमार यांची फसवणुक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

दिलीपकुमार यांची फसवणुक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Subscribe

अभिनेते दिलीपकुमार फसवणूक प्रकरणातील आरोपी बिल्डर समीर भोजवानी याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. समीर भोजवानी याने बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे दिलीपकुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांची फसवणूक केल्याचे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

समीर भोजवानी याने बनावट कागदपत्रे तयार करून दिलीपकुमार आणि सायरा बानू यांची फसवणूक केली. त्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने त्याला अटक केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.

- Advertisement -

प्रथम दर्शनी हे स्पष्ट होते की, बनावट कागदपत्रे तयार करण्यात समीर भोजवानीचा सहभाग होता. त्याने बनावट रबर स्टॅम्पचाही वापर केला. त्याप्रकरणी समीरने सब रजिस्ट्रर कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही मॅनेज केले. त्यामुळे समीर भोजवानी याची सुटका केली तर तो साक्षीदारांवर दबाव आणून पुरावे नष्ट किंवा त्यात मोडतोड करू शकतो, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

भोजवानी याच्यावर गुन्हा उशीराने नोंदवण्यात आला असला तरी तो गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे त्याला कालमर्यादा नाही, असे न्यायालाने स्पष्ट केले. दिलीपकुमार आणि सायरा बानू यांची फसवणूक केल्यानंतर समीर भोजवानी याने दिलीपकुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दिलीपकुमार आणि सायरा बानू यांनी त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

- Advertisement -

ही बातमी प्रसिद्ध होताच मुंबईत एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी या तक्ररीचे तातडीने दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी भोजवानी याला अटक केली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक अनधिकृत परकीय बनावटीचे पिस्तुलही आढळून आले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -