घरमहाराष्ट्रनाशिकमाहेरी आलेल्या पत्नीचा पतीने केला खून

माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने केला खून

Subscribe

नाशिकरोड येथील धक्कादायक घटना, हाॅटेलमध्ये बोलावून गळा दाबत घेतला जीव, पतीला अटक

नाशिकरोड येथील हाॅटेल मध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून खून घटना घडली असून नाशिकरोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पत्नीचा खून केल्यानंतर हाॅटेल मधून बाहेर पडणाऱ्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पाॅईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी आलेल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (दि.२८) सायंकाळी बिटको पाॅंईट येथील पवन हाॅटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पती पोपट बाहेर पडत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला लगेचच ताब्यात घेतलं. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक  गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -