घरक्राइमCruise drug bust : आर्यन, अरबाजला अटक करणारे मनीष भानुशाली, किरण गोसावी...

Cruise drug bust : आर्यन, अरबाजला अटक करणारे मनीष भानुशाली, किरण गोसावी कोण आहेत ?

Subscribe

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमध्ये आर्यन खान आणि आरबाझ मर्चंटला अटक करणारे अधिकारी हे मूळचे एनसीबी अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये आर्यनला पकडणारा किरण गोसावी व्यावसायिक तर आरबाझला पकडणारा मनीष भानुशाली भाजप संबंधित असल्याचे उघड झाले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाला आता नवे वळणं आलं आहे. मनीष भानुशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतचे फोटो आहेत. मनीष भानुशाली कोण आहेत याबाबत एनसीबीने खुलासा करावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे

कोण आहेत मनीष भानुशाली?

ड्रग्ज प्रकरणात आरबाझ मर्चंटवर कारवाई करणारे मनीष भानुशाली यांचे भाजपशी संबंध असल्याचे उघड झालं आहे. मूळचे डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरातील व्यावसायिक आहेत. मात्र जास्त वेळ भानुशाली दिल्लीत असतात. २०१२ पर्यंत भाजप कल्याणचे उपाध्यक्ष राहिलेत. तर २०१२ नंतर कोणतंही पद नसलं तरी पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता आहेत. फेसबुकवर नरेंद्र मोदीत, अमित शाह, जे पी नड्डा, प्रकाश जावडेकरांसह अनेक बड्या नेत्यांसोबत फोटो आहेत.

- Advertisement -

कोण आहेत किरण गोसावी?

देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. के.पी.जी ड्रीम्ज कंपनीची मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहेत. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. स्वतःच्या वाहनावर पोलिसाची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झालेत. २०१८ मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मलेशियातील नोकरीचं आमिष दाखवून ३ लाख उकळल्याचा आरोपही गोसावीवर करण्यात आला आहे.

- Advertisement -

क्रूझरवर ड्रग्ज सापडले नाही

एनसीबीला कॉर्डेलिया क्रूझवर कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. महाराष्ट्र एनसीबीने जे फोटो प्रसारित केले आहेत. ते दिल्लीच्या एनसीबीने दिलेले फोटो आहेत. कोणत्याही शिपवरचे फोटो नाहीत. हे फोटो दिल्लीच्या एनसीबी केबिनच्या आतमधले आहेत. असा दावा मलिक यांनी केली आहे. छापेमारी केलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यात येतो. जप्त करण्यात आलेली वस्तू एका रुममध्ये ठेवण्यात येते. जर त्या वस्तू दाखवायच्या असतील तर न्यायाधीशांच्या परवानगीने दाखवण्यात येतात परंतु अशा कोणत्याही प्रकारचे शिष्टाचार पाळण्यात आले नसल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

अमित शाह आणि मनीष भानुशाली 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनीष भानूशाली

किरण गोसावी आणि मनीष भानुशाली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -