घरक्रीडाtable tennis championship : महिला एकेरीत मधुरिका पाटकर, तर पुरुष एकेरीत रेगन...

table tennis championship : महिला एकेरीत मधुरिका पाटकर, तर पुरुष एकेरीत रेगन विजयी

Subscribe

८३ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

नाशिक : ८३ व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीएसटीएची प्रथम मानांकित मधुरिका पाटकर हिने टीएसटीए च्या पाचव्या मानांकित अनन्या बसाकचा ११-८, ११-४, ११-८, ११-८ असा ४-० ने सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीएसटीए सहाव्या मानांकित विधी शहाला नागपूरच्या बिगर मानांकित जेनिफर वर्गीस विरुद्ध विजय मिळवतांना वर्गिसच्या कडव्या आव्हानाला सामोरे जातांना ७ गेम पर्यंत झुंज द्यावी लागली अत्यंत अटीतटीच्या लढतीत ११-१३, १२-१४, ११-४, १२-१०, १०-१२, ११-९, ११-९ असा ४-३ ने विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीच्या सामन्यात प्रथम मानांकित मधुरिका पाटकरने विधी शहा चा ११-४, ११-४, ११-७, २-११, १२-१० असा ४-१ ने पराभव करून राज्य अजिंक्यपद मिळविले. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या व अर्जुन पुरस्कार विजेती मधुरीकाला विधीचा पराभव करणे फार कठीण गेले नाही.

- Advertisement -

पुरुष एकेरीत उपांत्य फेरीच्या झालेल्या पहिल्या लढतीत या स्पर्धेतील प्रथम मानांकित ठाण्याचा सिद्धेश पांडे ला ठाण्याचाच चौथ्या मानांकित दिपीत पाटील कडून ११-९, ११-८, ९-११, ११-७, १९-१७ असा ४-१ ने पराभव पत्करावा लागला. उत्कृष्ट फोरहँड व बॅकहँड फटक्यांचा वापर आणि वेळ पडली तर बचावात्मक शैलीचा वापर करणार्‍या या दोन्ही खेळाडूंनी प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फेडले. ३-१ असा दिपीत पुढे असतांना पाचव्या गेम मध्ये सिद्धेशने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला परंतु सरतेशेवटी १९-१७ असा दिपीतने तो गेम जिंकत ४-१ ने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीएसटीए च्या पाचव्या मानांकित रेगन पुण्याच्या बिगर मानांकित रजत कदम चा ११-४, ११-९, ११-८, ११-५ असा ४-० ने सहजरित्या पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सातवा मानांकित रेगन आल्बकरकी याने दिपीत पाटीलचा ११-५, ११-८, ११-३, ११-७ असा ४- ० ने सहजिरीत्या पराभव करत अजिंक्यपद मिळविले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड सबर्बन टेबल टेनिस असोसिशनचे चेअरमन योगेश देसाई, सचिव श्री समीर भाटे, राज्य संघटनेचे सदस्य सर्वश्री. महेंद्र चिपळूणकर, सिद्धनाथ गरुड, संजय मोडक, महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे सहसचिव राजीव देशपांडे, नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन सचिव शेखर भंडारी, यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी दीपक पाटील, योगेश देसाई व अक्षय गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी राजेश भरवीरकर, हरीश अग्रवाल, गौतम त्रेहान, मिलिंद कचोळे, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, सुहास आघारकर, जय मोडक, हर्षल पवार, अलका कुलकर्णी, स्वाती आघारकर, डॉ. सुनील हिंगमिरे आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -