Mundra Port Drug Case: गुजरात पोर्टवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIAकडे सुपूर्द

Mundra Port drug case Investigation handed over to NIA
Mundra Port Drug Case: गुजरात पोर्टवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIAकडे सुपूर्द

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जच्या प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणात एनआयएने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान गेल्या महिन्यात महसूल गुप्तचर संचालनालयने (डीआरआय) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा पोर्टवर दोन कंटेनरमधून २,९८८.२१ किलोग्रॅम हेरोईन जप्त केले होते. ज्याची किंमत जागतिक बाजारात २१ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी मुंद्रा पोर्टवर टॅल्कम पावडरच्या नावाने आयात केलेल्या २,९८८.२१ किलो हेरोईन जप्त केली. याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये आहे. आता याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडून केला जाणार आहे. माहितीनुसार, मुंद्रा बंदराचे काम अदानी समूह करते. याप्रकरणानंतर अदानी समूहाने म्हटले आहे की, डिआरआयसह फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर माल उघडण्यास, तपास करण्यास आणि जप्त करण्यास परवानगी आहे. पोर्टचे काम करण्यास ही परवानगी नाही आहे.

दरम्यान काँग्रेसने महाराष्ट्र युनिटने मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज जप्त प्रकरण दाबले जाण्यासाठी मुंबई क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकला? असा सवाल केला आहे. काँग्रसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, सरकारने राज्यात ड्रग्ज पदार्थाच्या तस्करीवर आणि त्याच्या सेवनावर बंदी घातली तर चांगले होईल. आम्ही या निर्णयाचे स्वागत करू.

पुढे ते म्हणाले की, गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्यावर कोणती कारवाई किंवा चर्चा झाली नाही, यावर लक्ष्य दिले पाहिजे. गेल्या महिन्यांची या छापेमारीपासून लक्ष्य हटवण्यासाठी अशाप्रकारची छापेमारी केली जात आहे? असा संशय व्यक्त केला आहे.


हेही वाचा – Cruise drug bust: मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय?