घरताज्या घडामोडीअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडली, नॉन कोविड इन्फेक्शनसाठी रुग्णालयात...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडली, नॉन कोविड इन्फेक्शनसाठी रुग्णालयात दाखल

Subscribe

बिल क्लिंटन यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Former US President Bill Clinton hospitalized ) अमेरिकेच्या वेळेनुसार, गुरुवारी संध्याकाळी एंजेल यूरेना यांनी ही माहिती दिली. ७५ वर्षीय बिल क्लिंटन यांना मंगळवारी संध्याकाळी कॅनिफोर्नियाच्या इरवियन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नॉन कोविड इन्फेक्शनमुळे त्यांन रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. बिल क्लिंटन यांचे डॉक्टर आणि इरविन मेडिकल सेंटरच्या मेडिसीन अध्यक्ष डॉ. अल्पेश अमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल क्लिंटन नॉन कोविड इन्फेक्शनसाठी आयीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या शरीरात IV एंटीबायोटिक्स आणि काही तरल पदार्थ आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

बिल क्लिंटन यांच्या खासगी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल क्लिंटन यांना सुरक्षेसाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. कोणताही काळजी करण्याचे कारण नाही त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते कुटुंबीय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलत आहेत. दोन दिवसांपासून बिल क्लिंटन यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होत आहेत. मात्र एंटीबायोटीक औषधांचा चांगला परिणाम त्यांच्यावर होत आहे. कॅनिफोर्नियातील रुग्णालयातील संपूर्ण टीम ही बिल क्लिंटन यांच्या सतत संपर्कात असून त्यांची काळजी घेत आहे. त्यामुळ बिल क्लिंटन लवकरचं बरे होऊन घरी परततील,असे त्यांनी सांगितले.

बिल क्लिंटन हे त्यांच्या फाउंडेशनच्या काही खाजगी कामासाठी कॅनिफोर्नियाला गेले होते. तिथे त्यांना थोडा थकवा जाणवल्याने त्वरित रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांना यूरिन इंन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. या वयात यूरीन इंन्फेक्शन होणे स्वाभाविक आहे त्यावर त्वरित उपचार करता येतात त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. बिल क्लिंटन यांना शुक्रवार पर्यंत एंटीबायोटीक देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

बिल क्लिंटन हे १९९३ ते २००१ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती होते. ४२ वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी अमेरिकेचे कामकाज पाहिले होते. २००१मध्ये बिल क्लिंटन यांनी व्हाइट सोडल्यानंतर त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागला. २००४मध्ये त्यांच्यावर क्वॉड बायपास करण्यात आली होती. तर २००५मध्ये फुफ्फुसासंबधीत आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – IT पोर्टलवर दिवसापोटी ३ लाख रिटर्न फाईल, वेबसाईटच्या अडचणी लवकरचं होणार दूर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -