घरमहाराष्ट्रनाशिकसंपत्तीच्या वादातून मुलाचा बापाला जीवे मारण्याचा प्रयत्न

संपत्तीच्या वादातून मुलाचा बापाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Subscribe

वाद सोडण्यासाठी आलेल्या लहान भाऊ व त्याच्या पत्नीसही केली जबर मारहाण

शिर्डी : मुलाने संपत्तीच्या वादातून बापावर ब्लेडच्या सहाय्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे घडली आहे. याप्रकरणी पिडीत बापाच्या फिर्यादीवरून मुलगा व सून यांच्यावर विविध कालामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी येथील रहिवासी कोंडाजी सुर्यभान गायके वय वर्षे 64, धंदा शेती, रा. पिंपळवाडी रोड गायके वस्ती शिर्डी, ता. राहाता यांनी मुलगा व सुने विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी व माझी पत्नी मिराबाई, दोन मुले व दोन सुना अश्यांसह एकत्र राहतो. मला एक मुलगी असुन तीचे लग्न झालेले आहे. माझा मोठा मुलगा संतोष याचे लग्न सन २०११ मध्ये झाले असुन त्याच्या पत्नीचे नाव रेणुका असे आहे. माझा लहान मुलगा दिलीप याचे लग्न सन २०१३ मध्ये उषा हिचेसोबत झाले आहे. माझा मोठा मुलगा संतोष हा गेल्या दोन वर्षांपासून माझ्यापासून वेगळा राहात आहे. माझ्याकडे ५ एकर शेती असुन राहते घर आहे. तसेच शिर्डी शहरात द्वारकामाई जवळ सुरदिप नावाचे हॉटेल आहे. माझा मोठा मुलगा संतोष हा वारंवार माझ्याकडे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतो. मी त्याला हिस्सा दिला नाही कारण मी जिवंत असून सदरची प्रपर्टी मी कमावलेली आहे. त्यामुळे संतोष व त्याची पत्नी रेणुका यांना वाईट वाटते. म्हणुन आमच्यात नेहमी वाद होतात. माझी मुलगी उषा सुदेश कातोरे हिचे सन २०१३ मध्ये लग्न झालेले आहे. ती सुद्धा प्रपर्टीमध्ये हिस्सा मागत असून तीने राहाता कोर्टात दावा दाखल केला आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमास मी घरात हॉलमध्ये झोपलो होतो. माझा लहान मुलगा दिलीप हा नेहमी प्रमाणे हॉटेलवर गेलेला होता. माझा मोठा मुलगा व सुन ही घरातच होती. माझी पत्नी व लहान सुन या देखील घरातच होत्या. यावेळी माझा मोठा मुलगा संतोष हा सामानाची आदळ आपट करून आरोळ्या मारत होता.

- Advertisement -

मी त्यास काय झाले याबाबत विचारले असता त्याने देवघरातील चौरंग आपटुन मला तुम्ही प्रोपर्टीमध्ये हिस्सा का देत नाही असे म्हणून शिवीगाळ केली. तो व त्याची पत्नी रेणुका यांनी माझ्याजवळ येवुन मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रेणुका हिने माझे दोन्ही पाय धरले व मुलगा संतोष याने माझे डोके धरुन दाबले आणि त्याच्या हातातील ब्लेडने माझ्या गळ्यावर वार केला. त्यामुळे मी मोठ्याने ओरडलो यावेळी माझ्या गळ्यावर मोठी जखम झालेली होती. त्याचवेळी माझी लहान सुन उषा ही पळत आली आणि संतोष व रेणुका यांना तीने बाजुला केले. त्या झटापटीत तिच्या डाव्या कानापासुन ते गळ्यापर्यंत जखम झाली आहे. नंतर मी घराच्या बाहेर आलो असता लहान मुलगा स्कुटीवर घरी आला तेव्हा मोठा मुलगा संतोष याने दिलीप याचा हात पिरगळुन त्यास खाली पाडुन त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटास व उजव्या पायाच्या मांडीवर चावा घेतला. त्यानंतर मला माझा मुलगा दिलीप, पुतण्या अमोल पोपट गायके यांनी हस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे.अशी फिर्याद कोंडाजी गायके यांनी त्यांचाच मुलगा संतोष, वय वर्षे ४० व सून रेणुका वय वर्षे ३७, यांच्याविरोधात दाखल केली असून, दोघांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३०७,३२३,३२४,३४,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -