घरताज्या घडामोडीKojagiri Purnima 2021: कोजागरी पौर्णिमेला करा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता कधीही भासणार...

Kojagiri Purnima 2021: कोजागरी पौर्णिमेला करा ‘या’ गोष्टी, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही

Subscribe

धार्मिकतेनुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनाच्या वेळी क्षीर सागरातून प्रकट झाली होती. त्यामुळे लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शरद पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. शरद पौर्णिमे दिवशी देवी लक्ष्मी आपले वाहन घुबडावर स्वार होऊन पृथ्वीवर फिरण्यासाठी येते असे मानले जाते. या दिवसाला कोजागरी पौर्णिमा देखील म्हटले जाते. यावर्षी पंचांगातील फरकामुळे काही ठिकाणी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा १९ ऑक्टोबरला आणि काही ठिकाणी २० ऑक्टोबरला साजरी केली जाईल. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विधीनुसार पूजा करण्याबरोबर काही गोष्टी देखील केल्या जातात. हे उपाय केल्याने पैशांची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते.

१. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू अपर्ण केल्या पाहिजेत, असे म्हटले जाते. या वस्तुंमध्ये मखाना, शिंगाडा, कमलाचे फूल, सुपारी, वेलची आणि पांढऱ्या कवड्याचा समावेश करा. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी रात्री पांढऱ्या कवड्यांनी आवश्य खेळले पाहिजे, असे म्हटले जाते.

- Advertisement -

२. पान हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पूजेत पानचा समावेश करा. या दिवशी लक्ष्मीला अर्पण केलेले पान सर्व लोकांमध्ये प्रसाद म्हणून वाटले पाहिजे. असे केल्याने समृद्धी घरी येते, असे मानले जाते.

३. शरद पौर्णिमेच्या रात्री अमृत वर्षा असते. त्यामुळे काही तासांसाठी चंद्राच्या प्रकाशात केसर घातलेली खीर ठेवा. मग रात्री ती देवी लक्ष्मीला अर्पण करा. त्यानंतर ती खीर प्रसाद म्हणून सर्वांना वाटा.

- Advertisement -

४. या दिवशी अष्ट लक्ष्मीची पूजा करणे लाभाचे मानले जाते. यादिवशी एक सुपारी कलावे म्हणजेच मंदिराबाहेर आल्यानंतर जो हातात धागा बांधला जातो, त्यामध्ये गुंडाळून लक्ष्मी देवीला अर्पण करा. त्यानंतर ती बांधलेली सुपारी जिथे पैसे ठेवले असतील किंवा तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने लक्ष्मी घरात नांदते.


हेही वाचा – Eid-e-Milad-un-nabi 2021: आज साजरी केली जातेय ईद-ए-मिलाद; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -