घरताज्या घडामोडीAryan Khanच्या सुटकेसाठी गौरीचा खानचा नवस, नोकरांना दिले 'हे' आदेश

Aryan Khanच्या सुटकेसाठी गौरीचा खानचा नवस, नोकरांना दिले ‘हे’ आदेश

Subscribe

नवरात्री आणि दसऱ्या सारख्या सणांच्या काळात आर्यन खानच्या अटकेमुळे संपूर्ण कुटुंब दु:खी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांना चांगलाच झटका बसला आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानच्या सपोर्टसाठी बॉलिवूमधील अनेक कलाकार पुढे आले. जवळपास २-३ वेळा आर्यनचा जामिन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. आर्यनच्या अटकेनंतर गौरी खानला मोठा धक्का बसला आहे. गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवस केल्याची माहिती समोर येत आहे. आपण पाहिले तर आर्यन खानच्या अटकेनंतर दोन दिवसांनी गौरी खानचा वाढदिवस होता. त्यानंतर नवरात्री आणि दसऱ्या सारख्या सणांच्या काळात आर्यन खानच्या अटकेमुळे संपूर्ण कुटुंब दु:खी होते. एकही सण त्यांनी साजरा केलेला नाही. आर्यनच्या सुटकेसाठी गौरीने नवस केला असून आर्यन बाहेर येत नाही तोवर कोणताही गोड पदार्थ न खाण्याचा पण गौरी केला आहे.

सणासुदीच्या दिवसात मुलगा तुरुंगात असल्याचे गौरीला फार दुख: झाले आहे. काही दिवसांपूर्वी घरातील एक नोकर खीर बनवत असताना गौरीने त्याला थांबवले आणि शाहरुख आणि मी कोणत्याही सेलिब्रेशनच्या मुडमध्ये नाही त्यामुळे मन्नत वरील सर्व नोकरांना आर्यन घरी परत येत नाही तोवर घरात कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा नाही, असे आदेश गौरीने दिले आहेत.

- Advertisement -

आर्यन खानला एसीबीने अटक केली त्या दिवसापासून शाहरुख खान एनसीबीकडे सतत चौकशी करत होता. आर्यन खानला अटक झाली त्यादिवशी केवळ २ मिनिटे शाहरुख आणि आर्यन खानचे फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर जवळपास १२ दिवसांनी आर्यनने आई गौरी खान आणि शाहरुख खान यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगवर संवाद साधला होता. यावेळी आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुख यांना अश्रू अनावर झाले होते. जवळपास १० मिनिटे आर्यन त्याच्या पालकांशी बोलू शकला होता.


हेही वाचा – Manike Mange Hiteचं हिंदी वर्जन, श्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -