घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात 'इतकी' झाली वाढ, जाणून घ्या नवे...

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘इतकी’ झाली वाढ, जाणून घ्या नवे दर

Subscribe

देशभरात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढत होताना दिसत आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी आज, मंगळवारी (२० ऑक्टोबर २०२१) पेट्रोल-डिझेलच्या दरात ०.३५ पैशांची वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.१९ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेल ९४.९१ रुपये प्रति लीटर झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर गेल्या काही दिवसांपासून १००च्या पुढे आहे. आज मुंबईत पेट्रोलची प्रति लीटर विक्री ११२.११ रुपयांनी होत आहे. तर डिझेलची प्रति लीटर विक्री १०२.८९ रुपयांनी होत आहे. मुंबईत डिझेलच्या दरात ०.३७ पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरात ०.३४ पैशांची वाढ झाल्याचे नोंद झाले आहे.

- Advertisement -

चैन्नईतील पेट्रोलचे दर १०३.०१ रुपये लीटर आहे. तर कोलकात्तामध्ये पेट्रोलचे दर १०६.४३ रुपये प्रति लीटर झाले आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रुपयांहून अधिक वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढत होत आहे. आता कच्च तेल ८४ डॉलर प्रति बॅरलच्या वर विकले जात आहे. दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढत होत असल्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या दरात वाढल्या आहेत. काही भाज्या आणि फळं पेट्रोल-डिझेलच्या दरात विकले जात आहेत.

देशात जून २०१७पासून प्रतिदिन पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले जात आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर परकीय चलन दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावरून ठरवले जातात. दररोज तेल विपणन कंपन्या दराचा आढावा घेतात. दररोज सकाळी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दर अपडेट करतात.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी कारवाई! सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; एक महिला ड्रग्ज पेडलर गजाआड


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -