घरताज्या घडामोडीAai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्री, मालिकेत एक नवा...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्री, मालिकेत एक नवा ट्विस्ट

Subscribe

मालिका एका रंजक वळणार येऊन ठेपली आहे.

मालिकेच्या छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. यात आई म्हणजेच अरुंधती (Arundhati)  तिच्या सुंदर अभिनयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील लाडकी आई झाली आहे. मालिकेत सध्या अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोट झाला असून अनिरुद्धसोबत संजनाने लग्न केले आहे. घटस्फोटानंतर अरुंधतीचे आयुष्य फार बदलले आहे. मालिका देखील एका रंजक वळणार येऊन ठेपली आहे. मालिकेत येणाऱ्या भागांमध्ये अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणारआहे. अभिनेता समीर धर्माधिकारी मालिकेत अरुंधतीचा मित्र म्हणून एंट्री घेणार आहे. समीर हा अरुंधतीचा कॉलेजमधील मित्र असून दोघे अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटणार आहेत. मित्राच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -

मालिकेत सध्या अनिरुद्धचा भाऊ अविनाश अडचणीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याला आर्थिक मदत करण्यासाठी अरुंधती कोणाच्याही नकळत घराचा अर्धा हिस्सा गहाण ठेवून १५ लाखांची मदत करते. अरुंधतीने इतके पैसे कुठून आणले असा प्रश्न विचारताच ती उत्तर देणे टाळते. ही गोष्ट अरुंधतीचा मुलगा यशला माहिती असते तो ही गोष्ट त्याची गर्लफ्रेंड गौरी सांगत असताना संजना सगळ ऐकते आणि घरच्यांसमोर अरुंधतीने लपवलेले सत्य सगळ्यांसमोर उघड करते.

- Advertisement -

अरुंधतीने घर गहाण ठेवल्याने घरात सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता मालिकेत अरुंधतीच्या मित्राची एंट्री होणार आहे. मित्राच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही दिसत आहेत.


हेही वाचा – ‘ये हैं मोहब्बते’ फेम अभिनेता अडकला विवाह बंधनात, पहा फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -