घरटेक-वेकलवकरच येत आहेत अॅपल वॉच 4, वाचा किंमत

लवकरच येत आहेत अॅपल वॉच 4, वाचा किंमत

Subscribe

आधीच्या वॉचपेक्षा मोठा डिसप्ले आणि अपग्रेटेड साऊंड असे काही खास फिचर या नव्या वॉच सीरिजमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे यांच्या किंमती संदर्भातील माहिती गॅजेट वेबसाईटने दिली आहे.

अॅपल वॉचच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर! जर तुम्ही अॅपल वॉच ४ च्या प्रतिक्षेत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण १९ ऑक्टोबरला अॅपल वॉच सीरिज ४ भारतात लाँच होणार आहे. अॅपल वॉच सीरिज ३ च्या यशानंतर अॅपल वॉचची पुढील सीरिज मोस्ट अवेटेड होती. कारण आधीच्या वॉचपेक्षा मोठा डिसप्ले आणि अपग्रेटेड साऊंड असे काही खास फिचर या नव्या वॉच सीरिजमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे यांच्या किंमती संदर्भातील माहिती गॅजेट वेबसाईटने दिली आहे. त्यामुळे ही बातमी अॅपल वॉच घेणाऱ्यांसाठी महत्वाची आहे.

अॅपल वॉचचे रेटकार्ड

एका गॅजेट वेबसाईटने गेल्या महिन्यात दिलेल्या माहितीनुसार अॅपल वॉच सीरिज ४ जीपीएस, ४० एमएम व्हेरिएंटची किंमत ४० हजार ९०० असणार आहे. तर ४४ एमएम व्हेरिएंटची किंमत ४३ हजार ९०० रुपये इतकी असणार आहे. याशिवाय अॅपल वॉच सीरिज ४ सेल्युलर एडिशन ४० एमएम अॅल्युमिनिअम केस सोबत त्याची किंमत ४९ हजार ९०० तर ४४ एमएम विथ अॅल्युमिनिअम केसची किंमत ५२ हजार ९०० रुपये असणार आहे. नवी वॉच सीरिज सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड अॅल्युमिनिअम केसमध्ये उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

या आहेत स्पोर्टस बँडच्या किंमती

अॅपल वॉच सीरिज ४ मधील सेल्युलर स्पोर्टस बँड स्टेनलस स्टीलमध्ये असून ४० एमएमची किंमत ६७ हजार ९०० रुपये आहे. तर मिलानीस लूप रिस्ट बँड ७६ हजार ७०० रुपयाला आहे. तर यात ४४ एमएम असून त्यांची किंमत ७१हजार ९०० तर लूप रिस्ट बँड ८० हजार ९०० रुपये असणार आहे.

इथे मिळतील अॅपल वॉच

अॅपल वॉच सीरिजची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. याची प्री ऑर्डर घेतली जाणार आहे. ऑनलाईन हे प्रोडक्ट मिळणार असून फ्लीपकार्ट, पेटीएम मॉलवर हे गॅजेट मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -