घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: विकेंडला फिरायला जाताय? तर आधी जाणून घ्या आजचे पेट्रोल...

Petrol Diesel Price: विकेंडला फिरायला जाताय? तर आधी जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Subscribe

मागील २९ दिवसात देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती २३वेळा वाढ

सणासुदीच्या दिवसात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दिवळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विकेंडला दिवाळीची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात. मात्र आपली वाहने प्रवासासाठी बाहेर काढण्याआधी बाजारातील पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये प्रत्येकी ३५ रुपयांची वाढ झाली असून दिल्लीत सध्या पेट्रोल १०७ रुपये प्रति लीटर असून डिझेल ९५.९७ रुपये प्रति लीटर आहे. राजधानी दिल्लीच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वाधिक पहायला मिळत आहेत. मुंबईत मागील काही दिवसात पेट्रोलच्या किंमतींपाठोपाठ डिझेलच्या किंमतींनीही शंभरी ओलांडली आहे. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना ११३.१४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी १०४ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

- Advertisement -

या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी इंधनांच्या किंमती स्थिर होत्या. मात्र बुधवार,गुरुवार, शुक्रवारी आणि आज शनिवारी सलग चौथ्या दिवशी इंधनांच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल डिझेलच्या किंमती.

मुंबई
पेट्रोल – ११३.१२ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०४.०० रुपये प्रति लीटर

- Advertisement -

दिल्ली
पेट्रोल – १०७.२४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.९७ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता
पेट्रोल – १०७.७८ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९९.०८ रुपये प्रति लीटर

चेन्नई
पेट्रोल – १०४.२२ रुपये प्रति लीटर
डिझेल – १००.२५ रुपये प्रति लीटर

बंगळूरू
पेट्रोल – ११०.९८ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०१.८६ रुपये प्रति लीटर

मागील २९ दिवसात देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती २३वेळा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांच्या किंमती वाढल्याने इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.


हेही वाचा – Indore Airport: बंगळुरू दिल्ली फ्लाइटमध्ये ५० वर्षीय व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -