घरताज्या घडामोडीDiwali vacations : महाराष्ट्रातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर ; ऑनलाइन क्लासही बंद...

Diwali vacations : महाराष्ट्रातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर ; ऑनलाइन क्लासही बंद राहणार – वर्षा गायकवाड

Subscribe

दिवाळीच्या सुट्टीबाबत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील,असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी,शिक्षक,पालक यांनासुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील शाळांना १४ दिवसांची सुट्टी जाहीर केल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्षे बंद असलेल्या महाराष्ट्रातील शाळा ४ ऑक्टोबरला सुरु झाल्या.मात्र अवघ्या काही दिवसांतच दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीबाबत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात होते.मात्र अखेर १४ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थी वर्गाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

कोविडच्या प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या मात्र दरवर्षी राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा आणि महाविद्यालयांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात. त्यामुळे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.


हे ही वाचा – Festive Skin Care Tips: दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा पार्लरचा ग्लो

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -