घरक्रीडाPak vs AFG : पाकचा विजय हा 'इस्लाम'चा विजय, पाकच्या विजयाचे अफगाणिस्तानकडून...

Pak vs AFG : पाकचा विजय हा ‘इस्लाम’चा विजय, पाकच्या विजयाचे अफगाणिस्तानकडून सेलिब्रेशन

Subscribe

सध्या सुरू असलेल्या टी २० वर्ल्ड कपच्या निमित्ताने पाकिस्तानकडून आता भारताविरोधात माइंड गेमला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचे खेळाडू मैदानात एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरीही दुसरीकडे मात्र एक प्रकारचा माइंड गेमला आता पाककडून सुरूवात झाली आहे. अफगाणिस्तानविरोधात झालेल्या सामन्यातील काही घटनांमुळे ही शंका आणखी वाढण्यासाठीची संधी निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या माइंड गेमविरोधातली शंका यामुळे आणखी वाढली आहे.

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात काही पाकिस्तानी फॅन्सने कमेंट्स आणि ट्रोलिंग केल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू शमीच्या समर्थनार्थ उतरले होते. त्यानंतरचा अफगाणिस्तानविरोधातील सामना पाकने जिंकला. पण अफगाणिस्तानच्या बाबतीत प्रत्येक पद्धतीने प्रयत्न करण्यात येत आहे की अफगाणिस्तानचा पराभव झालेला नाही. भावा- भावात दोस्ताना सामना होता असेच चित्र यानिमित्ताने निर्माण करण्यात येत आहे. खुद्द इमरान खान यांनीही यानिमित्ताने ट्विट करून माहिती दिली आहे. पण हे ट्विट पाहता हे सगळ जाणीवपूर्वक केले जात आहे का ? यामागे कोणता माइंड गेम आहे का ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

भारताने पाकविरोधात सामना गमावल्यानंतर दोन्ही देशातील खेळाडूंमधील एक सुंदर चित्र मैदानावर पहायला मिळाले. कॅप्टन विराट कोहलीने मोहम्मद रिझवाजनला जवळ घेत एक स्पोर्ट्समनशीप दाखवली. पाकच्या युवा खेळाडूंनीही धोनीकडून कानमंत्र घेत असल्याचे चित्र मैदानावर दिसून आले. शुक्रवारी पाक आणि अफगाणिस्तान सामन्यातही असेच एक चित्र दिसून आले. हा सामना १९ व्या शटकात पाकने जिंकला. पण पाकिस्तानचे खेळाडू खेळाच्या भावनेतून एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. या सामन्यानंतर ट्विटरवर आलेल्या पोस्टच्या कमेंट्समुळे आता एक नवे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानच्या मॅचमधील विजयाला इस्लामचा विजय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच असा ट्विटच्या माध्यमातून भारतात वातावरण दुषित करण्याचा एक प्रयत्न ट्विटरवर सध्या सुरू आहे.

- Advertisement -

विराट रिझवानमध्ये दिसलेले चित्र हे ट्विटरवर दिसलेल्या द्वेषामुळे विरोधात बदलले आहे. पण या फोटोंना आलेल्या कमेंट्समधून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. खरा भाऊ म्हणून या पोस्टवर कमेंट्स आहेत. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हारिस राउफ हा अफगाणिस्तानच्या स्पिनर राशिद खानची गळा भेट घेताना दिसतो आहे. अफगाणिस्तानचे विद्यार्थी निडर होऊन पाकिस्तानला सपोर्ट करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी पाकिस्तानच्या विजयावरही फटाके लावताना दिसले आहेत. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला होणाऱ्या सपोर्टमुळेच या संपुर्ण सामन्यातील विजयाला वेगळे चित्र निर्माण झाले आहे. पाकिस्तानत पत्रकारांकडूनही असाच द्वेष निर्माण करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. याचाच प्रत्यय हा अफगाणिस्तानच्या पत्रकार परिषदेतही दिसून आला. अफगाणिस्तानच्या नबीलाही पाकिस्तानकडून असेच प्रश्न विचारण्यात आले. अफगाणिस्तानातील सत्ता परिवर्तनाचा अफगाण क्रिकेटवर काय परिणाम झाला आहे ? पाकिस्तानचा अफगाणिस्तान सरकारशी असणाऱ्या चांगल्या संबंधाचा देशाला काय फायदा होईल ? असा सवालही नबीला विचारण्यात आला होता.


हेही वाचा T20 World Cup2021: Pak vs AFG और कोई हुकूम पाकिस्तान ? ४ षटकारानंतर अलीचा सवाल

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -