घरटेक-वेकFACEBOOK POST : फेसबुकवरील १० हजार पोस्टमध्ये धमक्या, चिथावणीखोर वक्तव्ये, द्वेषपूर्ण पोस्टची...

FACEBOOK POST : फेसबुकवरील १० हजार पोस्टमध्ये धमक्या, चिथावणीखोर वक्तव्ये, द्वेषपूर्ण पोस्टची संख्या सर्वाधिक

Subscribe

फेसबुक आज संवादाचे प्रभावी माध्यम समजले जाते. त्यामुळे जगभरात फेसबुक युजर्सची संख्या इतर प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या तुलनेत सर्वाधिक आहे. परंतु फेसबुकवरील सर्वाधिक पोस्टमधून धमक्या, चिथावणीखोर वक्तव्ये, द्वेषपूर्ण माहिती शेअर केली जातेय असा एका धक्कादायक अहवाल खुद्द फेसबुकनेच जाहीर केला आहे. त्यामुळे फेसबुकने प्रथमचं या प्लॅटफॉर्मवरून युजर्सला धमकावले जातेय, त्रास दिला जातोय हे मान्य केलं आहे. फेसबुक युजर्स जेव्हा सरासरी १० हजार पोस्ट पाहतो. तेव्हा त्यापैकी १५ पोस्ट ऑनलाईन धमक्या देणाऱ्या असतात. याशिवाय हिंसा आणि चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या ५ पोस्ट तर समाजात द्वेष, तेढ निर्माण करणाऱ्या ३ पोस्ट युजर्सला दिसतात.

फेसबुकने नुकतचं आपल्या नावात बदल करत मेटा हे नावे नाव जाहीर केले. यानंतर मेटाने एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी देण्यात आला होता. या अहवालानुसार, फेसबुकवरील प्रत्येक १० हजार पोस्टमधील ३ पोस्ट द्वेषपूर्ण असतात. मागील तिमाहीत ही संख्या ५ होती. हिंसाचार आणि चिथावणीखोर पोस्टची संख्या दर दहा हजारांमागे ४ ते ५ इतकी आहे.

- Advertisement -

फेसबुकने आत्तापर्यंत अशा १.३६ कोटी पोस्ट हटवल्या आहेत. यापैकी केवळ ३.३ टक्के पोस्ट युजर्सद्वारे कळवण्यात आल्या होत्या, तर बाकीच्या पोस्ट फेसबुकने सॉफ्टवेअरद्वारे पाळत ठेवून शोधल्या. तज्ञांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला की, फेसबुकमधील काही तांत्रिक उणीवा आणि प्रादेशिक आकलनाच्या अभावामुळे फेसबुकच्या सूचनेशिवाय अशाप्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसवल्या जात आहेत.

९२ लाख वेळा लोकांना आल्या धमक्या

फेसबुकने कबूल केले की, तीन महिन्यांत प्लॅटफॉर्मवरून ९२ लाख वेळा युजर्सना धमकावले गेले आणि त्रास दिला गेला. मात्र तेवढ्याच पोस्ट फेसबुकने काढून टाकल्या. बाकी न काढलेल्या पोस्टचा आकडा फेसबुकने जाहीर केला नाही.

- Advertisement -

इंस्टाग्रामवरही वाईट परिस्थिती

इन्स्टाग्रामवरील द्वेषपूर्ण पोस्टची देखील तपासणी करण्यात आली. त्यावेळी इंस्टाग्रामच्या १० हजार पोस्टपैकी दोन पोस्ट समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या होत्या. तर हिंसाचार आणि चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पोस्टची संख्याही त्याचबरोबरीने होती. अशाप्रकारच्या ३३ लाख पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवण्यात आल्या आहेत.

पोस्टची १४ मानकांद्वारे चाचणी

अशा प्रकारच्या पोस्ट काढून टाकणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हानात्मक काम असल्याचे मेटाने स्वत: जाहीर केले. कारण प्रत्येक पोस्टमधील प्रादेशिक संदर्भ आणि दृष्टीकोन समजून घेणे कठीण आहे. त्यामुळे फेसबुकवर १४ आणि इन्स्टावर १२ पॅरामीटर्सद्वारे वेगवेगळ्या पोस्टची चाचणी केली जातेय.

संवेदनशील जाहिराती होणार बंद

फेसबुकने जाहीर केले की, आरोग्य, वंश, राजकीय धर्म किंवा लिंग हितसंबंध यासारख्या संवेदनशील विषयांवर जाहिराती बंद केल्या जाणार आहेत. पुढील वर्षी १९ जानेवारीपासून याला सुरू होईल. सध्याच्या घडीला जाहीरात वितरक फेसबुकवर विविध विषयाशी निगडीत लोकांना, संस्थांना लक्ष्य करत जाहिराती वितरीत करत आहेत.

१६० भाषा मात्र ७० चे मूल्यांकन

Facebook त्याच्या मानकांचे उल्लंघन शोधण्यासाठी फक्त ७० भाषांमधील पोस्ट मोजल्या जात आहेत. त्यापैकी भारतीय भाषा फक्त पाच आहेत. मात्र या प्लॅटफॉर्मवर १६० संवाद भाषा आहेत. त्यामुळे फेसबुकची यंत्रणा फोल ठरत आहे.


Coronavirus : धक्कादायक! ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -