घरताज्या घडामोडी'तुझ्या कमरेवर पोळ्या भाजायच्या आहेत'; निर्मात्याची Mallika Sherawatकडे अजब मागणी

‘तुझ्या कमरेवर पोळ्या भाजायच्या आहेत’; निर्मात्याची Mallika Sherawatकडे अजब मागणी

Subscribe

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. सध्या मल्लिका शेरावत चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते. लवकरच मल्लिकाची एमएक्स प्लेवर नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान सध्या मल्लिका आपल्या करिअरबाबत अनेक खुलास करताना दिसत आहे. तिने अनेक वेळा निर्मात्यांनी तिच्याकडे केलेल्या अजब मागण्याबाबत खुलासा केला आहे. आता एका नव्या मुलाखतीमध्ये मल्लिका म्हणाली की, एक निर्माता एका हॉट गाण्यासाठी अजब कल्पना घेऊन आला होता.

मल्लिकाने सांगितले की, ‘निर्मात्याला तिच्या कमेरवर पोळ्या भाजताना दाखवायचे होते. अशी त्याची अजब कल्पना होती.’ The Love Laugh Live Showमध्ये मल्लिका शेरावत उपस्थितीत राहिली होती. मल्लिका या गाण्याबाबत ती म्हणाली की, ‘मी अशाप्रकारच्या गाण्यात काम करण्यास नकार दिला. मला ही कल्पना हास्यास्पद आणि खरी वाटली होती.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

- Advertisement -

हा निर्माता मल्लिकासोबत नक्की कसा बोलला ते तिने यावेळी सांगितले. ती म्हणाली की, ‘तो आपले विचार सांगताना म्हणाला की, खूप हॉट गाणं आहे. तू हॉट आहेस हे प्रेक्षकांना कसे समजेल? त्यामुळे तुझ्या कमरेवर पोळ्या भाजून तू इतकी हॉट आहेस हे दाखवायचे आहे, अशी अजबच कल्पना निर्मात्याने मांडली होती. तुम्ही असे कधी ऐकले आहे? पण मी स्पष्टपणे असे काही करणार नाही सांगितले.’

पुढे मल्लिका म्हणाली की, ‘भारतात हॉट कशाला मानले जाते, हे मला कळतच नाही. भारतात महिलांना हॉट दाखवण्याची कल्पना खूप अजब आहे. कारण मी जेव्हा करियरला सुरुवात केली होतीस, तेव्हा हे अजबच होते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

- Advertisement -

दरम्यान मल्लिकाने ‘ख्वाहिश’, ‘मर्डर’सारख्या चित्रपटात काम करून नाव कमावले आहे. तिला एकेकाळी सेक्स सिंबलच्या दृष्टीने पाहिले जात होते. एका मुलाखतीत मल्लिकाने सांगितले होते की, ‘तिच्या बोल्ड ऑनस्क्रीन अवतारमुळे तिला जज केले जात होते. शिवाय एका पुरुष सहकलाकाराने तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -