घरताज्या घडामोडीदेशाला मिळालेलं १९४७ चं स्वातंत्र ही भीक होती, देशाला खरं स्वातंत्र...

देशाला मिळालेलं १९४७ चं स्वातंत्र ही भीक होती, देशाला खरं स्वातंत्र २०१४मध्ये मिळालं – कंगना रणौत

Subscribe

भाजपचा अजेंडा आहे असे का म्हटले जाते हा देशाचा अजेंडा आहे.

आपल्या अभिनया व्यतिरिक्त वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान टाइम्स नाउ नवभारतला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कंगनाने केलेल्या विधानाने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिच्या ट्रोलर्सना चांगलीच चपकार दिली आहे. मुलाखतीदरम्यान कंगनाने म्हटले देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. मी जेव्हा राष्ट्रवादावर भाष्य करते, सैन्याबद्दल बोलते देशाची संस्कृती प्रमोट करते तेव्हा मी भाजपचा अजेंडा चालवते असे म्हटले जाते. हा भाजपचा अजेंडा आहे असे का म्हटले जाते हा देशाचा अजेंडा आहे. देशाला १९४७ साली स्वातंत्र मिळाले असे आपण म्हणतो परंतु तेव्हा मिळालेले स्वातंत्र ही भीक होती देशाला खरे स्वातंत्र २०१४मध्ये मिळाले असे कंगनाने म्हटले आहे.

- Advertisement -

कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त प्रतिक्रीय उमटल्या आहेत. रोफी गांधी या ट्विट युझरने कंगनाच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत लाकडाच्या घोड्यावर प्लॅस्टिकची तलवार घेऊन बसणारी वीरांगना, सरकारची बोली घेऊन स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचा अपमान करत आहे. देशासाठी हजारो भारतीयांच्या बलिदानांना भीक म्हणते, असे म्हटले आहे.

कंगना रणौतच्या या वक्तव्यावर भाजपचे संसदेतील वरुण गांधी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्रपिता माहात्मा गांधी, शहिद मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासह लाखो स्वातंत्र्य सेनानींचा कंगनाने अपमान केला आहे. कंगनाच्या या विचारांना वेडेपणा म्हणायचे की देशद्रोह?,असा सवाल वरुण गांधी यांनी केला आहे.

- Advertisement -

कंगानाने देखील वरुण गांधी यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटले आहे की, मी १८५७च्या अयशस्वी ठरलेल्या देशाच्या स्वातंत्रता संग्रामाचा उल्लेख देखील केला होता. ज्या स्वातंत्रता संग्रामामुळे ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरतेमध्ये वाढ झाली होती. गांधीजींनी मागितलेल्या भीकेमुळे जवळपास १०० वर्षांनंतर आपल्याला स्वातंत्र मिळाले,असे तिने म्हटले आहे.


हेही वाचा – बीएमसी घरावर हातोडा मारताना सपोटर्स कुठे होते ? कंगनाला विचारलेल्या प्रश्नावर आले उत्तर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -