घरमहाराष्ट्रसरकारला ब्लॅकमेल करण्याशिवाय शिवसेनेनं काय केलंय? - राज ठाकरे

सरकारला ब्लॅकमेल करण्याशिवाय शिवसेनेनं काय केलंय? – राज ठाकरे

Subscribe

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी #MeToo संदर्भात अभिनेते नाना पाटेकर यांची पाठराखण केली आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किंवा मला नेहमीच प्रश्न विचारले जातात, पण शिवसेनेनं गेल्या ४ वर्षांत काय केलंय असं त्यांना कधी कुणी विचारत नाही. गेल्या ४ वर्षांत शिवसेनेने सरकारला ब्लॅकमेल करण्याशिवाय काय केलं आहे?’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मंगळवारी रात्री राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी अमरावतीमध्ये राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेतली गेली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी वरील टीका केली आहे. ‘मला जसे खोदून खोदून प्रश्न विचारले जातात, तसेच प्रश्न उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये का विचारले जात नाहीत?’ असा उलट प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.

नाना पाटेकरांवरही बोलले राज ठाकरे

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या #MeToo मोहिमेवरही राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांवर यावेळी राज ठाकरेंनी भाष्य केलं. ‘नाना पाटेकर उद्धट आहे, कधी कधी मूर्खपणा करतो, पण नाना असं काही करेल असं मला वाटत नाही’, अशा शब्दांत राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची पाठराखण केली आहे. मात्र, असं बोलताना ‘महिलांचा मान हा राखला गेलाच पाहिजे’, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

- Advertisement -

मोदींसाठी पर्याय हवाय कशाला?

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पण याविषयी त्यांनी कुणीही काहीही विचारत नाही किंवा कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही. मोदी नकोत तर दुसरा पर्याय नाही असं नाही. मुळात मोदींना पर्याय हवाय कशाला? काँग्रेसच्या काळात नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी यांना तरी कुठे पर्याय होता?’ असं यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.


तुम्ही हे वाचलंत का? – राज ठाकरेंची उत्तर भारतीय नेत्यांशी चर्चा! काय झालं चर्चेत?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -