घरCORONA UPDATEcorona infection : कोरोनामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात, संशोधनातून...

corona infection : कोरोनामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात, संशोधनातून खुलासा

Subscribe

कोरोना महामारीदरम्यान लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्या असे आवाहन सतत केले जात आहे. यात अनेक देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती स्त्री आणि लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी न जाण्याच्या सुचना केल्या जात आहे. अशातच आता अमेरिकेतील एका संशोधनादरम्यान कोरोनामुळे अद्यापही गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोरोनाबाधित न झालेल्या गर्भवती महिलांपेक्षा कोरोनाबाधित गर्भवती महिलांना बाळंतपणात अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर स्टिलबर्थ म्हणजेच, गर्भपात होण्याचा धोकाही असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. याशिवाय डेल्टा व्हेरियंटमुळे धोका चार पटीने वाढतोय असेही म्हटले आहे. सेंटर्स फॉर डिजीज अँड प्रिवेंशनने (Centers for Disease Control and Prevention)  हे संशोधन केले आहे. मार्च २०२० आणि सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात झालेल्या १.२ दशलक्ष प्रसूतींवर आधारित हे संशोधन आहे.

या संशोधनानुसार, कोरोनाबाधित मातांनी मृत बाळांना जन्म दिल्याची काही प्रकरणं अत्यंत दुर्मिळ होती. हा दर सरासरी ०.६५ टक्के इतका होता. याशिवाय कोरोनाबाधित मातांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या आधी स्टिलबर्थ १.४७ पटींनी अधिक सामान्य होता. मात्र डेल्टा व्हेरियंटनंतर हे प्रमाण ४.०४ पटींनी अधिक आणि समग्र रुपात १.९० पटींनी अधिक होते.

- Advertisement -

या संशोधनात असेही नमुद करण्यात आले की, कोरोनाच्या वाढत्या जोखमीमुळे बाळ आणि आईच्या शरीरातील रक्त प्रवाहात कमी होत असल्याचे दिसून येतेय. दरम्यान कोरोनामुळे स्टिलबर्थचा धोका वाढतोय. यात कोरोनाबाधित मातांच्या प्रसूती अधिक गुंतागुतीची होतेय. दरम्यान इतरही अनेक अडचणी निर्माण होत आहेत मात्र सर्व बाबींचा विस्तृत विचार आणि संशोधन करणे गरजेचे आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -