घरताज्या घडामोडी"तु्म्हाला हिशोब करायचा असल्यास कधीपण करु", शिवेंद्रसिंह राजेंचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर

“तु्म्हाला हिशोब करायचा असल्यास कधीपण करु”, शिवेंद्रसिंह राजेंचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर

Subscribe

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवासाठी १०० टक्के आमदार शिवेंद्रसिंह राजे जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. यावर शिवेंद्रसिंह राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन शिंदेंनी केलं होते. तर आता तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण तयारी आहे. कधीपण हिशोब करु एवढं लक्षात ठेवा असे वक्तव्य शिवेंद्रसिंह राजे यांनी केलं आहे. राजेंनी आता शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी राजेंनी आमदार शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. राजे म्हणाले की, माझ्यावर खापर फोडून सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. आणि राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत. कुणाला हौस आहे. तुमच्या मागे लागायला, ते राष्ट्रवादीचे नेते म्हणाले परंतु त्यांचा रोख कुणाकडे हे मला माहिती नाही. कारण त्यांनी नाव नाही घेतलं. ते म्हणाले जिल्ह्यातील मोठा नेता होता. आता सगळ्यांनाच कामधंदा नव्हता की काय? जिल्ह्याचे राजकारण जिल्हा बँकेच्या भोवती फिरत होते की काय? मलाच कळत नाही. उगच सहानुभुती मिळवण्यासाठी हा सर्व प्रयत्न सुरु असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवेंद्रसिंह राजे पुढे म्हणाले की, शशिकांत शिंदे यांनी स्वतःच्या चुका आणि स्वतःच्या बगलबच्चांच्या अडचणी त्यांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्यांवर खापरं फोडणं बंद करून योग्य पद्धतीने राजकारण करावं. धोपटशाहीचा काही उपयोग होत नाही कारण प्रत्येकामध्ये उत्तर देण्याची धमक आहे. कुणाचा संसार हा कुणामुळे चालत नाही. हिशोब चुकता करतो अशी भाषा वापरुन कोण घाबरणार नाही. तुम्हाला हिशोब चुकता करायचा असल्यास आमचीही हिशोब चुकता करायची जबाबदारी आहे. कधीपण हिशोब चुकता करु एवढं लक्षात ठेवा असा इशाराच शिवेंद्रसिंह राजे यांनी दिला आहे.

शशिकांत शिंदे काय म्हणाले होते?

निवडणुकीतील पराभवावर शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना आरोप केला की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये १०० टक्के राजकारण झाले. काही लोकांना पाडण्याच्या संदर्भात १०० टक्के निर्णय झाला. जिल्ह्यातील अनेक लोकांनी याला मदत केली आहे. तर काही लोकांनी अप्रत्यक्षपणे निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवाला १०० टक्के शिवेंद्रसिंहराजे जबाबदार आहेत. यामागे फार मोठे षडयंत्र आहे. पक्षाच्या आदेशाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाच्या बाहेर जाऊन काहीही कऱणार नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी इच्छा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ST worker strike: मागील २४ तासात ३,०१० कर्मचारी निलंबित, २७० कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -