घरठाणेएकाच वेळी खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण

एकाच वेळी खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

सर्वांना केले उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली असून त्या सर्वांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच त्या सर्वांचे लसीकरण ही झाले आहे. त्या वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला ताप आला अशाप्रकारे कोरोनाचा पसार झाल्याची माहिती पुढे येत आहे.एकीकडे रुग्ण संख्या कमी होत असताना, एकाच वेळी ६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्या सर्वांना रुग्णालयात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शनिवारी संध्याकाळी ठाणे जिल्हा अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी खडवली येथील वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करायचे आहे. अशी माहिती त्यांनी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांना दिली. त्यानुसार डॉ.पवार यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला याची कल्पना दिल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने तयारी सुरू झाली. रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्णालयातही अवघे तीन रुग्ण आहेत. त्यामुळे स्टाफही कमी होता. मात्र एकाच वेळी ६७ जणांना उपचारार्थ दाखल केले जाणार असल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. त्या सर्वांना आणण्यापूर्वीच तातडीने वॉर्ड ही सज्ज ठेवून डॉक्टर-नर्स व इतर कर्मचारी वर्ग तात्काळ बोलवून घेतल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

दहा रुग्णवाहिका ठाण्यातून रवाना

त्या ६७ जणांना आणण्यासाठी १०८ नंबरच्या रुग्णवाहिका तातडीने खडवली येथे रवाना झाल्या होत्या. त्यामधून त्या कोरोना बाधितांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. पहिली रुग्णवाहिका सुमारे रात्री अकरा- साडे अकराच्या सुमारास आली. उशिरापर्यंत त्या सर्वांना दाखल करून घेतले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हेही वाचा – पनवेल-गोरेगाव लोकल १ डिसेंबरपासून धावणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -