घरताज्या घडामोडीOmicron Variant: WHO ने ओमिक्रॉनचा Risk Factor केला स्पष्ट, दिला महत्वाचा इशारा

Omicron Variant: WHO ने ओमिक्रॉनचा Risk Factor केला स्पष्ट, दिला महत्वाचा इशारा

Subscribe

जगभरात सध्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनबाबत चर्चा सुरू आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणतंय ओमिक्रॉन व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा खूप घातक असल्याचं म्हणत आहे. तर कोणी जास्त घातक नसल्याचं म्हणतं आहे. काही दिवसापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमिक्रॉनबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ओमिक्रॉनचा धोका खूप जास्त आहे. जगभरात या व्हेरियंटचा जास्त फैलाव होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटना पुढे म्हणाली की, ओमिक्रॉन जगभरात पसरण्याची अधिक शक्यता असून काही भागांमध्ये याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अजूनपर्यंत ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. तसेच त्याची नेमकी लक्षणे काय आहेत? हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान ओमिक्रॉनमुळे जगभरात दहशत पसरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जगभरात ओमिक्रॉनचे आतापर्यंत १६० रुग्ण आढळल्याचे स्पष्ट केलं आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन पसरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सवाना, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, इस्राईल, बेल्जियन, चेक गणराज्य, इटली, जर्मनी आणि हाँगकाँगमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे ९९ रुग्ण, हाँगकाँगमध्ये २५, नेदरलँडमध्ये १३, बोत्सवानामध्ये प्रत्येकी दोन-दोन, तर इस्राईल, चेक गणराज्य, इटली आणि जर्मनीमध्ये प्रत्येकी एक-एक ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे. भारतात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variantची काय आहेत लक्षणे? दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांचा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -