घरताज्या घडामोडीमुंबई-कोकण गाड्यांचा विस्तार, संरचना आणि वेळेत कोणताही बदल नाही

मुंबई-कोकण गाड्यांचा विस्तार, संरचना आणि वेळेत कोणताही बदल नाही

Subscribe

रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्स्प्रेसचा विस्तार खालील तपशीलांनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे.

10111 / 10112 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. ३०.१.२०२२ पर्यंत चालण्यासाठी अधिसूचित असलेली ट्रेन आता पुढील सुचनेपर्यंत वाढविण्यात येईल. 10103 /10104 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. ३१.१.२०२२ पर्यंत चालण्यासाठी अधिसूचित असलेली ट्रेन आता पुढील सुचनेपर्यंत वाढविण्यात येईल.

- Advertisement -

संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल होणार नाही

आरक्षण : 10111/10112 आणि 10103/10104 एक्स्प्रेस गाड्यांच्या विस्तारित सेवेसाठी बुकिंग दि. २.१२.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी, अनारक्षित मेल/एक्स्प्रेस शुल्क आकारले जाईल.

- Advertisement -

वरील गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा. फक्त वैध तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. मध्य रेल्वे यांच्या द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -