घरमुंबईमुंबई महापालिकेच्या सदस्य संख्यावाढीला राज्यपालांची मंजूरी; नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्यावाढीला राज्यपालांची मंजूरी; नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

Subscribe

मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरुन २३६ होणार आहे. महापालिकेतील सदस्य संख्या वाढवून प्रभागात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता.

राज्यापालांनी इतर पालिका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र मुंबई पालिकेचा प्रस्ताव प्रलंबित होता. दरम्यान, आता राज्यपालांच्या मंजुरीनंतर मुंबई पालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (१८८८ चा ३) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे.

- Advertisement -

२०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणं आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचं २७ ऑक्टोबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दरम्यान, या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूरी दिल्याने लवकरच मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २३६ होईल.


हेही वाचा – परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं लसीकरण असणं अनिवार्य – महापौर किशोरी पेडणेकर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -