घरक्रीडाInd vs NZ 2nd test : मुंबईकर एजाजने आठव्या वर्षीच भारत सोडला...

Ind vs NZ 2nd test : मुंबईकर एजाजने आठव्या वर्षीच भारत सोडला होता

Subscribe

एजाज पटेलने आज भारताविरोधात चमकदार कामगिरी करत एका नव्या विक्रमाची नोंद ही मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर केली. पण एजाज हा मुळचा भारतातील मुंबईतलाच आहे. मुंबईत जन्मलेला एजाजचा जन्म हा १९८८ साली झाला. एजाज ८ वर्षांचा असताना त्याचे कुटूंब हे न्यूझीलंडला स्थायिक झाले. एजाजने आज केलेल्या विक्रमामुळे तो अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांच्या बरोबरीला जाऊन पोहचला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात एजाजच्या फिरकीची जादू चालली. फिरकीपटूंना आणि जलद गोलंदाजांना मुंबईची खेळपट्टी मदत करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण एजाजच्या मोठ्या कामगिरीमुळे त्याला मुंबईतील खेळपट्टी लकी ठरली आहे. एजाजने ४७.५ ओव्हर्समध्ये १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. (Ajaz patel born in mumbai left india at equals 10 wickets record with anil kumble )

- Advertisement -

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एजाज हा १० विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने भारतात पाकिस्तान विरोधात १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. तर इंग्लंडच्या जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरोधात दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. एजाजने संघाने टाकलेल्या एकुण ओव्हर्सपैकी ओव्हर अर्धा ओव्हर एकट्यानेच म्हणजे ४७.५ ओव्हर टाकल्या. यामध्ये १२ ओव्हर मेडन टाकल्या. त्याबदल्यात ११९ धावा देत १० विकेट्स घेण्याचा विक्रम त्यने नोंदवला.

३३ वर्षीय एजाज पटेलचा जन्म हा मुंबईतील जोगेश्वरी येथे झाला आहे. आठ वर्षापर्यंत एजाज मुंबईत जोगेश्वरीत आपल्या कुटूंबासोबत राहिला. त्यानंतर १९९६ साली एजाज आपल्या पालकांसोबत न्यूझीलंडला शिफ्ट झालाय. एजाजने आपल्या १० विकेट्समध्ये अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केले. त्यामध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, मोहम्मद सिराज, मयंक अग्रवालला बाद केले. त्यामध्ये कोहली, पुजारा आणि अश्विनला आपले खातेही उघडता आले नाही.

- Advertisement -

कोणाच्या विक्रमाची बरोबरी ?

एजाजच्या आधी अनिल कुंबलेने पाकिस्तान विरोधात एकाच इनिंगमध्ये १० विकेट्स घेतले होते. एकाच मॅचमध्ये १० विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा हा तिसरा खेळाडू आहे. याआधी अनिल कुंबळेने भारतात ही कामगिरी केली होती. एजाज आपला ११ कसोटी सामना सध्या मुंबईत खेळतोय. मोहम्मद सिराज हा दहावा खेळाडू ठरला, रचिन रविंद्रने एजाजच्या गोलंदाजीवर झेल घेतला. या कामगिरींनंतर अंपायर्सकडून त्याने हा बॉल घेतला. भारतीय संघानेही त्याच्या कामगिरीचे अभिवादन केले. तर न्यूझीलंड संघानेही पॅव्हिलिअनमध्ये पहिल्यांदा जाण्याचा मान त्याला दिला. पटेल हा आपल्या जन्मस्थळी खेळणारा दुसरा खेळाडू आहे. याआधी डगलस जार्डिन भारतात खेळला आहे.

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात दहा विकेट्स घेण्याचा पहिला मान हा इंग्लंडच्या जिम लेकरला मिळाला होता. १९५६ साली झालेल्या सामन्यात जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरोधात १० विकेट्स घेतल्या. या सामन्यात ५१.२ ओव्हरमध्ये ५३ धावा देत १० विकेट्स घेतल्या. त्यानंतर १९९९ मध्ये अनिल कुंबळेने या विक्रमाची बरोबरी केली. कुंबळेने दिल्लीत पाकिस्तान विरोधातील कसोटी सामन्यात १० विकेट्सचा विक्रम केला. त्यानंतर १९९९ मध्ये २६.२ ओव्हरमध्ये अनिल कुंबळेने ७४ धावा देत १० विकेट्स घेतल्या होत्या.


IND vs NZ 2nd Test : १० विकेट्स घेणारा एजाझ पटेल ठरला तिसरा खेळाडू, वानखेडेवर नव्या इतिहासाची नोंद

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -