घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मार्चमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार; आठवलेंचं भाकीत

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मार्चमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार; आठवलेंचं भाकीत

Subscribe

भाजपच्या नेत्यांनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार कधी कोसळणार याचं भाकीत केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मार्चमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं भाकीत रामदास आठवले यांनी केलं आहे. ते लोणावळा येथे बोलत होते.

रामदास आठवले पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी लोणावळा येथे होते. या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत भाकीत केलं. महाविकास आघाडी सरकार फार काळ टीकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा, असं आवाहन केलं. तसंच, पुढे बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल, असं दावा रामदास आठवले यांनी केला.

- Advertisement -

मोदींना हरवणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही

रामदास आठवले यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. शरद पवार आणि ममता बॅनर्जी त्यासाठी बैठका घेत आहेत. पण आम्हाला काही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हलविणे हे कोण येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असं आठवले म्हणाले.

चैत्यभूमीवर गर्दी करू नका

वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आठवले यांनीही भीम अनुयायांना उद्या चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने देशातील आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये, घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन आठवले यांनी केलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -