घरक्रीडाDavis Cup 2021 : रशियाने तब्बल १५ वर्षांनी जिंकला डेव्हिस कप; मेदवेदेव...

Davis Cup 2021 : रशियाने तब्बल १५ वर्षांनी जिंकला डेव्हिस कप; मेदवेदेव ठरला विजयाचा हिरो

Subscribe

रशियाने १५ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर डेव्हिस कप टेनिस टुर्नामेंटचा किताब जिंकला आहे

रशियाने १५ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर डेव्हिस कप टेनिस टुर्नामेंटचा किताब जिंकला आहे. रशियन स्टार डॅनिल मेदवेदेवने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मारिन सिलिकवर विजेतेपदाची नोंद केली. त्याने सिलिकचा ७-६, ६-२ अशा फरकाने पराभव केला. यामुळे रशियाने क्रोएशियावर २-० अशी शानदार आघाडी घेतली. २००६ नंतर रशियाने तबब्ल १५ वर्षांनी हे पहिले डेव्हिस कपचे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान या विजयाचा हिरो डॅनिल मेदवेदेव ठरला आहे. त्याने विजयानंतर म्हंटले की, “हा खूप चांगला क्षण आहे. मी स्वत:पेक्षा संघासाठी खूप खुष आहे. आमचा चांगला संघ आहे आणि संघातील स्थितीदेखील खूप चांगली आहे”.

डॅनिल मेदवेदेवने सलग दुसरा विजय मिळवलेला हा पाचवा सामना ठरला आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी नोवाक जोकोविचचा पराभव करून यूएस ओपनच्या रूपात त्याचा पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकला होता.

- Advertisement -

तत्पूर्वी, माद्रिद एरिना येथे खेळल्या गेलेल्या डेव्हिस कप फायनलमध्ये आंद्रे रुबलेव्हने बोर्ना गोझोचा पराभव करून रशियाला लवकर आघाडी मिळवून दिली. रुबलेव्हने हा सामना ६-४, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. रशियाने २००२ मध्ये डेव्हिस कपचे विजेतेपदही पटकावले होते. रशियाप्रमाणेच क्रोएशिया देखील तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात होता. २००५ आणि २०१८ मध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. मात्र रशियाने त्याच्या तिसऱ्या विजेतेपदाच्या आशा धुळीत मिशवून तब्बल १५ वर्षांनी डेव्हिस कपवर आपले नाव कोरले आहे.


हे ही वाचा: http://Axar Patel : जडेजा-अश्विनसोबत ऑलराउंडर खेळणे म्हणजे…; हे स्वप्नासारखे अक्षर पटेलची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -