घरताज्या घडामोडीआता LPG Cylinder चे वजन कमी होणार ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

आता LPG Cylinder चे वजन कमी होणार ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

Subscribe

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.याशिवाय गृहिणींचे बजेटही कोलमडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सततच्या महागाईमुळे संतापाची लाट आहे. त्यातच आता केंद्रसरकारने महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेणार आहे.घरगुती वापरात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरचे वजन आता कमी होणार आहे. एलपीजी सिलिंडरचे १४.२ किलोग्रॅम असलेले वजन ५ किलोपर्यंत कमी होणार आहे.या एलपीजी सिलिंडरच्या वजनामुळे वापरकर्त्यांना प्रामुख्याने महिलांना वाहतूकीत त्रास होत आहे. ह्याच बाबीचा विचार करुन सिलिंडरचे वजन कमी करण्याचा निर्णय याशिवाय अनेक पर्यायांचा निर्णय केंद्र सरकार लवकरात लवकर घेणार आहे. याबाबतची माहिती पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत दिली आहे. “स्त्रियांनी इतके वजनदार सिलिंडर उचलावे, अशी आमची इच्छा नाही, त्यामुळे घरगुती वापरात येणाऱ्या या सिलिंडरचे वजन कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे”असे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारचा १४.२ किलोग्रॅम वजनाचे सिलिंडर ५ किलोपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी उज्ज्वला २.० आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत देशभरात ८.८ कोटी एलपीजी कनेक्शन जारी करण्यात येत आहेत. अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत दिली.

- Advertisement -

देशभरात १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना  सुरू करण्यात आली होती. ही योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ आणि महिला सदस्यांसाठी आहे.याशिवाय केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना उज्ज्वला २.० ही या वर्षी १० ऑगस्टला अमलात आणण्यात आली. योजनेतंर्गत एक कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.


हे ही वाचा – Today Petrol Diesel Price : आज पेट्रोल झाले स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -