घरताज्या घडामोडीएका चुकीमुळे रातोरात झाला करोडपती

एका चुकीमुळे रातोरात झाला करोडपती

Subscribe

एका व्यक्तीने एकत्र खरेदी केलेल्या दोन लॉटरीच्या तिकिटामुळे तो रातोरात करोडपती झाला आहे. या व्यक्तीने चुकून एकाच लॉटरीचे दोन तिकिट खरेदी केले होते. परंतु तो नशीबवान निघाला, त्याला दोन्ही लॉटरीचे तिकिट लागले. ही घटना अमेरिकेत घडली आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या उत्तरी कॅरोलिना राज्यामध्ये राहणाऱ्या स्कॉटी थॉमसला दोन्ही लॉटरी मिळून जवळपास ५.५ कोटी रुपये जिंकले आहेत. थॉमसने सांगितले की, एक दिवशी तो घरी होता. त्याने टाईमपाससाठी लॉटरी फॉर लाईफचे एक तिकिट खरेदी करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर त्याने लॉटरीच्या तिकिटासाठी ऑनलाईन डिटेल्स भरण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

पुढे थॉमसने सांगितले की, खरंतर मला समजलंच नाही की, मी दोन वेळा डिटेल्स भरून एकाच जागी दोन तिकिट खरेदी केली आहेत. मला वाटले मी एकच लॉटरीचे तिकिट खरेदी केले असेल. परंतु दुसऱ्यादिवशी मला माझ्या मुलाने सांगितले की, एकाच लॉटरीमध्ये २ वेगवेगळ्या अमाउंट का लिस्टेड आहे. त्यानंतर मला समजले की, चुकून मी एकाच लॉटरीचे दोन तिकिट खरेदी केली. मला काही वेळासाठी खूप वाईट वाटले की, मी दोन तिकिट का खरेदी केली. परंतु जेव्हा मला दोन्ही लॉटरी लागल्या आहेत असे कळाले तेव्हा मला विश्वासच बसला नाही. जशी मला याबाबत माहिती मिळाली मी थोड्यावेळासाठी जमिनीवर झोपलो. आता मी खूप खुश आहे. माझ्या या चुकीमुळे नुकसान नाही तर जास्तच फायदा झाला.


हेही वाचा – अरे बापरे! कोणत्याही वेदनेशिवाय होणार एका मिनिटात मृत्यू, ‘या’ देशाने दिली सुसाइड मशीनला मंजूरी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -