घरदेश-विदेशनववधू मेगनसाठीही नव्या घरात नवी बंधने

नववधू मेगनसाठीही नव्या घरात नवी बंधने

Subscribe

प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मर्केलचा विवाह पार पडून आता मर्केल राजघराण्याची सून बनली आहे. मात्र यामुळे मेगनवर अनेक बंधने आली आहेत. मात्र नव्या घरातील प्रत्येक नववधूप्रमाणे ती सर्व बंधने तिला काटेकोरपणे पाळावी लागणार आहेत. कारण राजघराण्यासाठी काही नियम आहेत आणि राजपरिवारातील सर्वांना ते पाळावी लागतात.

नव्या घरातील नियमांनुसार मेगन कोणाही परक्या व्यक्तीसोबत सेल्फी काढू शकणार नाही. अभिनेत्री असल्यामुळे तिला अनेकांबरोबर सेल्फी काढाव्या लागल्या असतील तर ती सवय आता मोडावी लागेल. सोशल लाईफमध्ये ती अ‍ॅक्टीव्ह राहू शकणार नाही. तसेच सुरक्षेशिवाय एकटी बाहेर जाऊ शकणार नाही. ती स्वतःचे सोशल मीडिया अकाऊंटही चालवू शकणार नाही. तर तिने केलेल्या कामाची माहिती तिला राजपरिवाराच्या अधिकृत अकाऊंटवर द्यावी लागेल.

- Advertisement -

मेगन अमेरिकन आहे. मात्र लग्नानंतर ती ब्रिटिश नागरिकत्व घेऊ शकेल. तरीही तिला सार्वजनिक निवडणुकात मतदान करता येणार नाही. कारण ब्रिटनमध्ये राजपरिवार मतदान करू शकत नाही. पूर्वी हे बंधन फक्त राणीसाठी होते. मात्र आता ते सर्व राजपरिवारासाठी आहे. मेगन रंगीबेरंगी नेलपॉलिश वापरू शकणार नाही. राजपरिवारातील महिलांना नैसर्गिक लूक बंधनकारक आहे. अभिनेत्री असल्याने मेगनने अनेकदा ऑटोग्राफ दिले आहेत. मात्र यापुढे ती ऑटोग्राफ देऊ शकणार नाही. मात्र कुठे भेटीसाठी गेल्यास तेथील व्हिजिटर बुकमध्ये सही करू शकेल.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -