घरताज्या घडामोडीज्यांनी अडवाणींना समोर उभंही राहू दिलं नाही... राऊतांचा खुर्चीच्या मुद्द्यावर भाजपला टोला

ज्यांनी अडवाणींना समोर उभंही राहू दिलं नाही… राऊतांचा खुर्चीच्या मुद्द्यावर भाजपला टोला

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा १२ खासदारांच्या निलंबनाच्या आंदोलनाच्या ठिकाणी एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी खुर्ची आणताना दिसले. हा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून काही नेत्यांनी राऊंतावर टिकेचा बाण सोडला. अखेर या फोटोच्या निमित्ताने राऊत व्यक्त झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करण बंद करा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. पण त्याचवेळी संजय राऊत यांनी आपल्याला शिकवण्यात आलेल्या संस्कृतीची आठवण करून दिली. ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना बसण्यासाठी खुर्ची सोडाच, पण साध उभंही राहून दिल नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये अशा शब्दात राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आणि पंतप्रधान मोंदींना टोला लगावला. (sanjay raut slams bjp over viral chair photo for sharad pawar lalkrishna adwani)

जेष्ठांचा आदर करावा असे संस्कार मला बाळासाहेबांकडून मिळाले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू आहेत. शरद पवार, लालकृष्ण अडवाणी हे पितृतुल्या आहेत. शरद पवारांच्या टिकाणी लालकृष्ण अडवाणी असते, तर मी त्यांना खुर्ची दिली असती. मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव हे त्याठिकाणी असते तरीही मी त्यांना खुर्ची दिली असती. कारण समोरल्या व्यक्तीला बसण्यासाठी पाट द्यावा, ही आपली संस्कृती सांगते. ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना बसण्यासाठी खुर्ची सोडा, समोर उभंही राहू दिल नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला. पवारांचे वय झाले आहे. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. म्हणूनच त्यांना खुर्ची आणून दिली असे ते म्हणाले. जेष्ठांचा आदर करणे, त्यांचा सन्मान करणे हा आमच्यावर झालेला संस्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. पण यात कुणाला राजकारण सुचत असेल तर ही विकृती असल्याचे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

संजय राऊत फोटोमध्ये खुर्ची उचलताना दिसत आहेत. पण या फोटोच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणामुळे राऊतांना विरोधकांचा समाचार घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यांना राजकारण दिसत, त्यांनी डोक्यातला कचरा साफ करावा. अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला डंपिंग ग्राऊंडमध्ये गाढेल. असेच प्रकार सुरू ठेवले तर राज्यात तुमच सरकार कधीच येणार नाही, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.


Bipin Rawat Chopper Crash: हेलीकॉप्टर्सच्या अपघातात घातपाताची शंका पंतप्रधानांच्या मनातही असेलच, मोदींनी खुलासा करण्याचे संजय राऊतांचे आवाहन

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -