घरताज्या घडामोडीKatrina Kaif | कतरिनाच्या एंगेजमेंट रिंगमध्ये 'नीलम' रत्न, जाणून घ्या या रत्नाचे...

Katrina Kaif | कतरिनाच्या एंगेजमेंट रिंगमध्ये ‘नीलम’ रत्न, जाणून घ्या या रत्नाचे फायदे

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकि कौशल यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला.लग्नानंतर समोर आलेल्या दोघांच्याही आऊटफिटची सर्वत्र चर्चा होत आहे. या वेडिंग लूकसोबतच आता कतरिनाच्या् अंगठीचीही विशेष चर्चा होत आहे.ही अंगठी करतरिनाची एंगेजमेंट रिंग असल्याची चर्चा होत आहे.या अंगठीत एक निळ्या रंगाचे रत्न आहे.ही अंगठी टिफनी अँड कंपनीने डिझाइन केली आहे. या निळ्या रत्नाला ‘नीलम’ असे म्हटले जाते.ज्योतिष शास्त्रात नीलम हे खूप मौल्यवान रत्न मानले जाते आणि ते धारण केल्याने शुभ-अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात.

काय आहे नीलम रत्न ?

- Advertisement -

ज्योतिषशास्रात हिरा, माणिक,पुष्कराज,नीलम,पन्ना ही सर्वात महत्त्वाची रत्ने मानली जातात. ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांच्या उपायांसाठी नऊ रत्ने आणि अनेक उपरत्नांचा उल्लेख आहे. या नऊ रत्नांपैकी नीलम हे अत्यंत प्रभावी रत्न आहे.हा निळ्या रंगाचा रत्न एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर अशा प्रकारे परिणाम करतो की एकतर त्या व्यक्तीच्या जीवनात चांगले घडते नाहीतर संपूर्ण वाईटच घडते.ज्योतिष शास्त्रात नीलम शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. सामान्यतः, जेव्हा व्यक्तीला शनि ग्रह मजबूत करण्यासाठी किंवा संतुलन राखण्यासाठी नीलम घातला जातो.

अश्याप्रकारे तुम्ही हे ‘नीलम’रत्न पारखू शकता…

दुधात नीलमचा दगड टाका, काही वेळाने तुम्हाला दुधाचा रंग निळा झाल्याचे जाणवेल.याशिवाय तुम्ही हा नीलम रत्न मुठीत बंद करुन ठेवलात तर तुम्हाला उबदारपणा जाणवेल.

- Advertisement -

नीलमणी घालण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

तुमची कुंडली एखाद्या ज्योतिषाला दाखवा आणि तुम्हाला नीलम घालायची की नाही हे जाणून घ्या.नीलम थेट बोटात घालण्यापेक्षा आधी काही दिवस उशीखाली ठेवून झोपावे. एखाद्या कपड्यात बांधून तो तुमच्या सोबत ठेवा आणि थोडे दिवस तुमच्यासोबत सर्वकाही ठिक चालले आहे की नाही हे तपासून पाहा.

नीलम परिधान करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • नीलम रत्न गोल नसून, चौकोनी असावा.
  • ते डाव्या हातात चांदीच्या अंगठीत घालावे.
  • नीलम घालण्यासाठी सर्वोत्तम दिवस शनिवार आहे आणि तो मध्यरात्रीच घातला पाहिजे.
  • नीलम धारण केल्यानंतर घरामध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना आवश्यक वस्तूदान करा.

हे ही वाचा -Vastu Tips For Car : घराचीच नाही तर वाहनाचीही वास्तू असली पाहिजे बरोबर ; जाणून घ्या ‘या’ गोष्टी


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -