घरदेश-विदेशअयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही तर बाबरांच्या वंशजाची इच्छा !

अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही तर बाबरांच्या वंशजाची इच्छा !

Subscribe

निवडणुका जवळ आल्या की, अयोध्देतील श्रीराम मंदिर उभारणीचा मुद्दा नेहमीच गरम होतो. दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्देत जाण्याची घोषणा केली. श्रीरामाचे मंदिर तुम्हाला बांधता येत नसेल तर आम्ही बांधू .. अशी ललकारीही भाजपला दिली. पण अयोध्देत श्रीरामाचे मंदिर व्हावे अशी इच्छा खुद्द बाबरचे सातवे वंशज हैदराबादचे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुस्सी यांनीअखिल भारत हिंदु महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांना एक पत्र पाठवून व्यक्त केली आहे.आमच्या पूर्वजांकडून भगवान श्रीरामाचे मंदिर उध्दवस्त झाले असेल तर मी त्याची क्षमा मागतो. श्रीराम मंदिर उभारणीच्यावेळी मी एक सोन्याची वीट देईन, हेच हिंदु -मुस्लिम एकोप्याचे प्रतिक असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.बाबरी मशिदीच्या नावावर राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी मुस्लिम समाजाला केले आहे. डोंबिवलीतील हभप अनंतबुवा भोईर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना या पत्राचा खुलासा केला.

डोंबिवलीतील हभप अनंतबुवा यांनी ३०० जणांच्या टीमसह अयोध्येत हिंदीतून गीतरामायण सादर केले. त्यावेळी गीतरामायणाच्या व्यासपीठावरूनही तुस्सी यांनी संताच्या समक्ष ही घोषणा केली होती असेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी बुवांनी त्यांना ग.दि.माडगूळकर लिखित हिंदी अनुवादीत गीत रामायण भेट दिले. रामदास मिशन युनिवर्सल सोसायटी यांच्यावतीने १३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१८ दरम्यान रामराज्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने अयोध्येत ग.दि.माडगुळकर रचित गीतरामायण प्रथमच हिंदीतून सादर करण्याचा मान डोंबिवलीतील हभप अनंतबुवा भोईर यांना मिळाला होता.११ व १२ फेब्रवारीला श्री अयोध्दा येथील कारसेवक पुरम येथे बुवांनी हिंदीतून गीतरामायण सादर केलं. या कार्यक्रमासाठी देशातील संत महंत उपस्थित होते.

- Advertisement -

अयोध्येत गीत रामायण सादर केल्यानंतर २४ मार्चला रामराज्य संमेलन तिरूवनंतपुरम रामकंद परिक्रमा येथे तर केरळमध्ये पद्मनाभ मंदिरात बुवांचे गीतरामायण पार पडले. बुवांनी तीन वर्षापूर्वीच अयोध्येत पहिल्यांदाच मराठीतून सुमारे पाचशे लोकांसह गीतरामायण सादर केले होते. मात्र राममंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजय महंत शरणजी यांनी हिंदीतून गीतरामायण सादर करण्याची सुचना बुवांना केली होती. त्या सुचनेनुसारच त्यांनी अयोध्देत हिंदीतून गीत रामायण सादर केले. पंडीत रूद्रदत्त मिश्र व ज्येष्ठ हिंदी कवी अलोक भट्टाचार्य यांनी गीत रामायणाचे हिंदीत भाषांतर केल होत असे बुवांनी सांगितलं.२००५ पासूनच बुवांनी गीत रामायणाला सुरूवात केली.

गीत रामायणात एकूण ५६ गीत आहेत. ३०० जणांच्या टीमसह त्यांनी हे गीतरामायण सादर केले. त्यावेळी अयोध्देत बाबराचे वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुस्सी आले होते. आमच्या गीतरामायणाच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी जय श्रीरामाचा नारा दिला असेही बुवांनी सांगितले. मागील महिन्यात १६ सप्टेंबर २०१८ ला तुस्सी यांनी अखिल भारत हिंदु महासभेकडे राममंदिर उभारणीची इच्छा प्रकट केलीय ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही बुवा म्हणाले. ही रथ यात्रा ८ राज्यातून सहा हजार किमी ४१ दिवस सुरू होती राममंदिराची प्रतिकृती होती असेही बुवांनी सांगितले.

- Advertisement -

काय लिहिले त्या पत्रात …

माझे पूर्वज बाबर यांचे सेनापती मीरबाकी यांच्याद्वारे १५२८ मध्ये अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर उद्ध्वस्त केले. त्या कृत्याबद्दल मी समस्त हिंदुंची मनापासून माफी मागतो. सुप्रीम कोर्टात श्रीराम जन्मभूमी विवाद सुरू आहे. बाबरी मशिदीच्या नावावर राजकारण करू नका, असे आवाहन मी सर्व मुस्लिम पक्षकारांना करतो. आमचे पूर्वज बाबर यांनीही त्यांच्या वसीयतमध्ये या कृत्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुस्तानात संत महात्म्यांचा आदर आणि मंदिराचे रक्षण करा, असेही म्हटले आहे. त्यामुळे बाबरचे वंशज या नात्याने सर्व हिंदुधर्मियांची क्षमा मागून श्री राम मंदिर उभारणीसाठी तन मन धन सहयोग देण्याचे व एक सोन्याची वीट देण्याचे वचन देता. ते हिंदू -मुस्लिम एकोपाचे प्रतिक असेल.

….. म्हणून उध्दव ठाकरेंना बळ आलय का ?

बाबराचे वंशज

प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुस्सी यांनी महिनाभरापूर्वी आयोध्देतील श्रीराम मंदिर समितीला पत्र पाठवून श्रीरामाचे मंदीर उभारणीसाठी सहयोग दर्शविल्यानेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना श्रीराम मंदिर उभारणीसाठी बळ चढलय का ? त्यामुळेच दसरा मेळाव्यातून त्यांनी तमाम हिंदुला घेऊन् राममंदिर बांधू अशी ललकारी दिली का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बाबराचे वंशज हे राममंदिर उभारणीसाठी इच्छा प्रकट करतात, मग हिंदु संघटना काहीच करू शकत नाहीत का ? अशीही नामुष्की ओढवू नये म्हणूनही शिवसेना राममंदिर उभारणीच्या मैदानात उतरल्याचेही बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -