घरताज्या घडामोडीभांडुपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी

भांडुपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी

Subscribe

भांडुपमध्ये चार बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची फौजदारी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेनंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे अद्यापही रूग्णालयात आले नाहीत, असं शेलार म्हणाले.

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात सलग ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खळबळ उडवली होती. रूग्णालयातील जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला काल विधानसभेत निलंबित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

चार निष्पाप बालकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून ही घटना मुंबई महापालिकेच्या सत्ताधीशांना यांची माहिती नव्हती. परंतु जेव्हा विरोधी पक्षांनी ही बाब विधानसभेत मांडली तेव्हा ही घटना पालिकेला समजली. त्यामुळे त्याची चौकशी जरी करण्यात येत असली तरी चौकशी करणारे हे पालिकेच्या सायन रूग्णालयातील डॉक्टर आहेत, असं शेलार म्हणाले.

वैद्यकीय अधिकाऱ्याचं (MOH) निलंबन

बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहीजे. तसेच याबाबत चर्चा करण्यात आली पाहीजे, अशी प्रकारची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. परंतु फडणवीसांनी या मुद्द्यावर जोर धरल्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचं (MOH) निलंबन केलं असून त्यावर चौकशी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय स्किइंग चॅम्पियनशिपमध्ये आंचल ठाकुरची विक्रमी कामगिरी, कांस्य पदक पटकावत रचला इतिहास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -