घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावात तलवारींचा साठा जप्त; दोघांना अटक

मालेगावात तलवारींचा साठा जप्त; दोघांना अटक

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलीस इन अ‍ॅक्शेन मोडमध्ये

मालेगावात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस इन अ‍ॅक्शेन मोडमध्ये आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दि.२४) दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल ३० तलवारी जप्त केल्या. मोहम्मद मेहमुद अब्दुल रशीद अन्सारी उर्फ मस्तान (रा. कमालपुरा, मालेगाव), मोहम्मद बिलाल अहमद उर्फ बिलाल दादा (रा.इस्लामपुरा, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलीस ठाणेनिहाय कारवाई सुरु केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना शुक्रवारी (दि.२४) मालेगाव काही व्यक्तींकडे धारदार तलवारींचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाडवी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुसर यांनी पथकामार्फत मोमीनपुरा परिसरात शोध सुरु केला. पथकाने दालवाला चौकाजवळ, मुल्लाबाबा चक्कीच्या मागे एका गाळ्यात छापा टाकत दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३० धारदार तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -