घरताज्या घडामोडीयावर्षीही ओटीटीचाच बोलबाला?

यावर्षीही ओटीटीचाच बोलबाला?

Subscribe

नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांनी आपले सब्सक्राइबर्स वाढविण्यासाठी आपल्या मेम्बरशिपचे भाव कमी केले तर आधी मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या ऍमेझॉन, हॉटस्टारसारख्या माध्यमांनी आपले भाव वाढवले. येणार्‍या वर्षात या घटना अत्यंत महत्वपूर्ण ठरतील, लोकांचा ओटीटीकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले जातील आणि 2022 मध्येही ओटीटीच वर्चस्व कायम राहील. पण या सोबतच एक गोष्ट ओटीटीच्या पथ्यावर पडणार नाही असं दिसतंय, ती म्हणजे मोबाईल कंपन्यांनी वाढविलेले डेटा प्लान्सचे दर.

नवीन गोष्टीची उत्सुकता प्रत्येकालाच असते, नवी गाडी असो किंवा नवा मोबाईल, प्रत्येक खरेदीत आनंद शोधण्याची आणि एन्जॉय करण्याची सवय आपल्याला आहे. यातच नवीन वर्षाचा आनंद हा अनेक गोष्टींसाठी खास असतो, सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन संकल्प घेत, दुःखाला विसरून सुखाची अपेक्षा करत आपलं सेलिब्रेशन सुरु असतं, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या आनंदावर विरझण पडलंय. 2021 ला तरी कोरोनातून सुटका होईल असं वाटत होतं, पण वर्षाच्या शेवटी ओमायक्रॉन आला आणि निर्बंधांमुळे नववर्षाचं स्वागत घरात राहूनच करावं लागलं, मनोरंजन क्षेत्रात 2021 मध्ये अनेक बदल घडले. गेल्या वर्षात ओटीटीच बॉक्स ऑफिसचा राजा ठरला खरा, पण वर्षाच्या शेवटी सूर्यवंशी ,पुष्पा,स्पायडरमॅन : नो वे होम, 83 सारख्या सिनेमांनी दीडवर्षांपासून घरात असलेल्या प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवले. 2021 हे वर्ष बॉलिवूड आणि भारतीय सिनेजगतासाठी अनेक कारणांमुळे स्पेशल ठरलं. 2020 मध्ये ज्या ओटीटी माध्यमांनी आपले पाय भारतात रोवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी या इंडस्ट्रीत चांगलाच जम बसवला, सलमान खानसारख्या सुपरस्टारलासुद्धा आपला सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करावा लागला.

नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांनी आपले सब्सक्राइबर्स वाढविण्यासाठी आपल्या मेम्बरशिपचे भाव कमी केले तर आधी मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या ऍमेझॉन, हॉटस्टारसारख्या माध्यमांनी आपले भाव वाढवले. येणार्‍या वर्षात या घटना अत्यंत महत्वपूर्ण ठरतील, लोकांचा ओटीटीकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले जातील आणि 2022 मध्येही ओटीटीच वर्चस्व कायम राहील. पण या सोबतच एक गोष्ट ओटीटीच्या पथ्यावर पडणार नाही असं दिसतंय, ती म्हणजे मोबाईल कंपन्यांनी वाढविलेले डेटा प्लान्सचे दर, ओटीटीवर कंटेंट पाहण्यासाठी मेम्बरशिप सोबत मोबाईल डेटा असणं देखील गरजेचं असतं. पण काही दिवसांपूर्वीच सर्व मोबाईल कंपन्यांनी आपले डेटापॅकचे दर 30 टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. आता या वाढलेल्या दराचा भार श्रीमंताना तितकासा जाणवणार नसला तरी मध्यमवर्गीयांवर मात्र परिणाम करणारा आहे, डेली 2 जीबीचा डेटापॅक वापरणारे अचानक 1.5 जीबीवर आले आहेत, ज्याचा प्रत्यक्ष परिणाम ओटीटीवरील कंटेंट पाहण्यावर होईल.

- Advertisement -

ओटीटीची सवय भारतीयांना हळूहळू पडू लागलीये असं आपण म्हणू शकतो, पण यातही ओटीटीसमोर एक मोठे आव्हान आहे, भारतात ओटीटीवर रोज एखादा सिनेमा किंवा सिरीज प्रदर्शित होऊ लागलीये, कंटेंट वाढू लागलाय पण ओटीटीवर प्रदर्शित होणारा कोणता कंटेंट भारतीय अधिक प्रमाणात पाहतात? हे जर तुम्ही वाचाल तर तुम्हालाही धक्का बसेल. मार्च 2021 मध्ये इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार भारतीयांनी 188 बिलियन मिनिट्स वेगवेगळ्या ओटीटी माध्यमावर घालवले आहेत, पण मुद्दा हा नाहीये. या 188 बिलियन मिनिटांपैकी सर्वात मोठा वाटा आहे तो डेली सोपचा… एक दोन नव्हे तर तब्बल 69 बिलियन मिनिट्स भारतीयांनी ओटीटीवर डेली सोप पाहिल्यात, ही गोष्ट उदाहरण आहे, आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या स्वभावाच…आपल्याला नवीन गोष्टीची सवय लागते खरी पण हळूहळू आपण त्या गोष्टीला संपूर्णपणे इंडियन करून टाकतो. ओटीटीच्या बाबतीतदेखील हेच झाल्याचं पाहायला मिळालं. 1500 रुपये खर्चून गेम ऑफ थ्रोन्स, मार्वल सिरीज पाहण्यासाठी घेतलेले हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन कधी साथ निभाना साथिया पाहण्यात गेलं हे आपल्याला कळलंच नाही. नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडीओ यांसारखे मोजके ओटीटी अजून सो कॉल्ड इंडियन बनले नाहीत हे आपले भाग्यच म्हणावे लागेल, कारण अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या वेबकंटेंटपेक्षा डेली सोपमुळे लोकप्रिय झालेत. उदाहरणार्थ वूट माध्यमावर हिट झालेली शेवटची सिरीज जी मला आवडते ती म्हणजे असुर, पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की, डेली सोप पाहण्यात सर्वात मोठा वाटा म्हणजे एकूण 31 टक्के वाटा एकट्या वूट माध्यमाचा आहे. डेलीसोपनंतर दुसरा नंबर लागतो तो मुव्हीजचा आणि यामध्ये बाजी मारली आहे डिस्नी हॉटस्टारने. कारण इतरांच्या तुलनेत 31 बिलियन मिनिट्स पैकी 33 टक्के शेयर हा हॉटस्टारचा आहे. याला कारण म्हणजे हॉटस्टारवर मोफत उपलब्ध असलेले सिनेमे, इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत हॉटस्टारवर फ्री टू वॉच सिनेमांची संख्या अधिक असल्याने सिनेमा पाहण्याच्या यादीत त्यांचं नाव सर्वात आधी येते. एप्रिल 2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2021 मध्ये ओटीटीच्या पेड युजर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली, याच कालावधीमध्ये सबस्क्रिप्शन 8 टक्क्यांनी वाढले.(इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार) फेब्रुवारीमध्ये ओटीटीच्या महसुलातही तब्बल 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2022 हे वर्ष भारतातील ओटीटीच्या चाहत्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे, कारण अनेक लोकप्रिय हिंदी वेब सीरिजचे पुढचे भाग यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. ओमायक्रॉनचे वाढते सावट पाहता यावर्षीही सिनेमागृहे पूर्णक्षमतेने सुरू होतील? याबद्दल शंका आहे. 31 डिसेंबरला रिलीज होणार्‍या जर्सी सिनेमाचे प्रदर्शन लांबले, जानेवारीमध्ये आरआरआर, गंगुबाई काठियावाडी, राधेश्याम, पृथ्वीराज यांसारखे मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. आता ओमायक्रॉन निर्बंधांमुळे ते रिलीज होतील का? आणि रिलीज झाले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल का? हा मोठा प्रश्न आहे. यातच ही गोष्ट ओटीटीच्या पथ्यावर पडेल असं दिसतंय, यावर्षी अनेक महत्वाच्या आणि गाजलेल्या हिंदी सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ज्यात दिल्ली क्राईम, पाताल लोक, असुर, पंचायत, फॅमिली मॅन आणि अनदेखीसारख्या वेबसिरीजचा समावेश आहे. यांची नावदेखील वाचली तरी यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. केवळ जुन्या सीरिजचे पुढचे सीझनच नव्हे तर अनेक नव्या सिरीजदेखील आपल्याला या वर्षी पाहायला मिळणार आहेत. ज्यात फाइंडिंग अनामिका, ह्युमन, स्कॅम 2003 आणि रुद्रासारख्या वेबसीरिजचा समावेश आहे.

- Advertisement -

सीरिजसोबत अनेक मोठे सिनेमेदेखील या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित होतील, जर निर्बंध कायम राहिले तर आपला थोडा तोटा सहन करून निर्माते काही बिग बजेट सिनेमेदेखील ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवतील. कोरोनामुळे अनेकांचं नुकसान झालंय आणि आजही होतं आहे, मात्र हा कोरोना ओटीटीसाठी गुड लक ठरलाय असं म्हणायला हरकत नाही, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जे बदल किमान 5 वर्षांनी होणे अपेक्षित होते तेच बदल केवळ या एका महामारीमुळे दीड वर्षात झालेत. भारतीय प्रेक्षकांना सिनेमे थिएटरमध्ये पाहण्याची सवय आहे. तिथेच ते सिनेमा एन्जॉय करतात. त्यांना थिएटरपासून दूर न्यायला वेळ लागेल, असं आपण कितीही म्हणत असलो तरी यावर्षी जर थिएटर बंद राहिले तर मात्र ओटीटीपासून भारतीय प्रेक्षकांना दूर करून पुन्हा थिएटरकडे वळविणे अवघड होईल, असं एकंदरीत चित्र निर्माण होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -