घरताज्या घडामोडीकोरोनाचा परिणाम- कंपन्यांचे पुन्हा एप्रिलपर्यंत वर्क फ्रॉम होम

कोरोनाचा परिणाम- कंपन्यांचे पुन्हा एप्रिलपर्यंत वर्क फ्रॉम होम

Subscribe

कोरोनाची ही  तिसरी लाट मार्च अखेरीस नियंत्रणात येण्याची शक्यता असल्याने काही कार्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशभरात कोरोनाबरोबरच ओमीक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम कॉर्पोरेट क्षेत्रावर झाला असून अनेक कंपन्यांनी हळू हळू वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता कोरोनाची ही  तिसरी लाट मार्च अखेरीस नियंत्रणात येण्याची शक्यता असल्याने काही कार्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या आठवड्यात औषधांची निर्मिती करणाऱ्या सिप्ला या फार्मा कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले. तसेच जोपर्यंत ऑफिसमध्ये येण्याच्या सूचना दिल्या जात नाहीत तोपर्यंत कोणीही कंपनीत फिरकू नये अशाही सूचना काही कार्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

महिंद्रा अँड महिंद्रा म्युच्युअल फंडने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस ऑफिस आणि तीन दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचा नियम लागू केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारने सर्वच राज्यांना कडक निर्बंध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मध्यप्रदेश बिहार नंतर महाराष्ट्र राज्य सरकारनेही सरकारी आणि खासगी कार्य़ालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती सक्तीची केली आहे. कोरोनाच्या पहील्या लाटेवेळी आणि दुसऱ्या लाटेवेळीही खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं निवडले होते. मात्र दिवाळीनंतर कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र होते. तसेच लसीकरणही सुरू झाल्याने ऑफिसेस सुरू करण्यात आली. मात्र डिसेंबर २०२१ पासून पुन्हा कोरोना आणि नवीन आलेल्या ओमीक्रॉनमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकारी आणि खासगी ऑफिसेसमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्याच उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारपर्यंत देशात १.२३ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा वाढण्याची भीती तज्त्रांनी व्यक्त केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात सगळ्याच क्षेत्रातील कंपन्या वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -