घरनवी मुंबईकोपरखैरणे, घणसोलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

कोपरखैरणे, घणसोलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Subscribe

अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयांतर्गत एस.एस, रूम नं. ८१, सेक्टर २, कोपरखैरणे येथे नवी मुंबई यांनी महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू असल्यामुळे कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु या ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू होते. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, ६ मजूर, १ गॅस कटर, २ ब्रेकर, १ पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

त्याचप्रमाणे घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर १५३, समोर सेक्टर २१, तळवली, नवी मुंबई येथे आरसीसी तळमजला स्लॅबचे काम प्रगती पथावर असलेले व प्लॉट नंबर ५६, सेक्टर २१ तळवली समोरील मोकळ्या भुखंडावर चाळीचे अनधिकृत बांधकाम सुरु होते. या बांधकामधारकांनी नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. त्यामुळे या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फंत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधिताने केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी, १० कर्मचारी मजूर, २ ब्रेकर, १ गॅस कटर, १ जेसीबी तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार तैनात होते.

- Advertisement -

तसेच बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रांतर्गत राजीव गांधी उड्डाणपुल ते नेरूळ रेल्वे स्टेशन (पूर्व) या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथवरील ४० विनापरवाना फेरीवाले यांचेवर धडक कारवाई करण्यात येऊन या ठिकाणी ४ हातगाड्या व मोठ्या प्रमाणात नाशिवंत माल जप्त करण्यात आला. नेरूळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) अभ्युदय बँकेसमोरील सर्व फेरीवाले हटविल्याने नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरातील पादचारी पुलावरील मार्ग मोकळा झाला. तसेच नेरूळ सेक्टर १६ व १८ च्या परीसरातील ३५ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येऊन या ठिकाणाहून १ हातगाडी जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे जुईनगर सेक्टर २४ मधील रस्त्याच्या फुटपाथवरील २५ विनापरवाना फेरीवाला यांचेवर कारवाई करण्यात येऊन २ हातगाड्या व नाशिवंत माल जप्त करण्यात आला. या कारवाईत नेरूळ अतिक्रमण विभागाकडून ७ हातगाड्या व नाशिवंत माल जप्त करण्यात येऊन या सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी कोपरखैरणे येथील क्षेपणभूमीमध्ये जमा करण्यात आला. नेरूळ विभागातील फेरीवाला हटाव धडक मोहिमेकरता नेरूळ अतिक्रमण विभागाकडील अधिकारी, कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

हेही वाचा – 

ती आक्षेपार्ह दृष्य सिनेमातून वगळली ; महेश मांजरेकरांची शरणागती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -