घरमनोरंजनना मी ड्रग अ‍ॅडिक्ट ना लेस्बियन - तनुश्री दत्ता

ना मी ड्रग अ‍ॅडिक्ट ना लेस्बियन – तनुश्री दत्ता

Subscribe

तनुश्रीने भारतात आल्यानंतर नाना पाटेकरवर केलेल्या आरोपनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. आता हे प्रकरण वेगळ्याच वळणार गेले असून राखी सावंत सतत तनुश्रीवर वेगळे आरोप करत असल्याचे समोर येत आहे. त्यावर तनुश्रीनेही स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या राखी सावंत आणि तनुश्री दत्ता या दोघीही हार न मानता एकमेकींवर आरोप – प्रत्यारोप करत रोजच्या बातम्यांमध्ये झळकत आहेत. दोनच दिवसापूर्वी तनुश्री लेस्बियन असून तिने माझ्यावर रेप केला आहे असा आरोप राखी सावंतने केला होता. तनुश्रीने राखीवर मानहानीचा दावा ठोकल्यानंतर राखीने आपल्या घरी पत्रकार परिषद घेत तनुश्रीवर हा नवा आरोप लावला. इतकंच नाही तर, तनुश्रीला ड्रग्जची वाईट सवय असून तिने त्यासाठी स्वतःचं आयुष्य बरबाद केल्याचंही मत यावेळी राखीने मांडलं होतं. या सगळ्या राखीच्या वक्तव्यानंतर आता तनुश्री पुन्हा एकदा रागावली असून तिने यासंदर्भात एक स्टेटमेंट काढलं आहे.

तनुश्रीने काय म्हटलं आहे स्टेटमेंटमध्ये?

हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना काहीच माहीत नाही. अशा तर्‍हेचे अभियान सरळमार्गी नक्कीच चालत नाहीत. या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी सांगत आहे की, मी ड्रग अ‍ॅडिक्ट नाही, शिवाय मी सिगारेट वा दारूही पित नाही. इतकंच नाही तर मी लेस्बियनदेखील नाही. मी सर्वसामान्य महिला आहे जिला पितृसत्ताक आणि स्त्री जातीचा द्वेष करणार्‍या समाजाला सांभाळण्यासाठी सध्या अडचण येत आहे. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरोप करून माझं तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा तर्‍हेच्या अभियानाची चेष्टा करू नये कारण याच अभियानामुळे समाजात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे, असे स्पष्टीकरण तनुश्रीने राखीच्या आरोपांनंतर दिले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

तनुश्रीने राखीवर १० कोटीचा मानहानीचा दावा केल्यानंतर राखी सावंतने आपण तनुश्रीवर आता ५० कोटीचा मानहानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर तनुश्रीवर तिने अनेक आरोप लावले असून ती ड्रगच्या आहारी गेली असल्याचेही म्हटले आहे. या सर्व प्रकरणाला तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांपासून सुरुवात झाली असून #MeToo अन्वये गेल्या महिन्याभरात अनेक मोठ्या लोकांची नावं पुढे आली असून बर्‍याच महिला बोलू लागल्या आहेत. मात्र यामधील सत्यता अजूनही लोकांपुढे आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -