घरमहाराष्ट्रमराठा तरुण-तरुणींना व्यावसायासाठी बिनव्याज कर्ज!

मराठा तरुण-तरुणींना व्यावसायासाठी बिनव्याज कर्ज!

Subscribe

साताऱ्याचे कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा तरूण-तरुणींना उद्योगासाठी कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत कर्जाचा पुरवठा करणार आहे. कर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योग व्यावसाय करता यावा यासाठी कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याज कर्ज मिळणार आहे. कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ किमान १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणार आहे. कर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मराठा युवक, युवतींना त्याचा लाभ व्हावा म्हणून प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी, महामंडळाचे अध्यक्ष आणि बँक अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी तातडीने बँकेच्या प्रतिनिधींची नावे, मोबाईल नंबरसह माहिती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

‘मराठा तरुण-तरुणींसाठी महामंडळ सतत प्रयत्नशील’

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी महामंडळाची भूमिका स्पष्ट केली. ‘माझ्या वडिलांच्या नावे कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली. यानंतर महामंडळाच्या चेअरमनपदावर माझी नियुक्ती झाली. मराठा युवक, युवतींना स्वत:च्या पायावर उभे राहून उद्योग व्यवसाय सुरू करता यावा म्हणून महामंडळ सतत प्रयत्नशील राहणार आहे. या तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज हे महामंडळ भरणार आहे. जिल्ह्यात ११ तालुक्यात योजनेची माहिती पोहोचावी, तसेच गरजूंना त्याचा लाभ व्हावा म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी पुढाकार घेऊन बँकेचा महामंडळाबरोबर करार करून दिला आहे.

- Advertisement -

टाळाटाळ करणाऱ्या बॅंकेची यादी मुख्यमंत्र्यांकडे जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार मंच आणि मुद्रा लोनचाही फायदा मराठा समाजाला व्हावा म्हणून कर्ज घेणार्‍या व्यक्तीस ऑनलाईन फॉर्म भरून ए. एम. टी. सर्टिफिकेट दिले जाणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. ज्या बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांची यादी करून बँकेवर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनती केली जाणार आहे. सातारा येथील आय.डी.बी.आय. शाखेत उद्योग, व्यवसायाच्या दृष्टीने गरजूंना प्रशिक्षणाची सोय केली आहे. कर्जाचे प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत एकत्रित करून गरजूंना लाभ दिला जाणार आहे.


हेही वाचा – नीट नाच सांगितले, तर तरुणांनी गोळी झाडली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -