घरताज्या घडामोडीBirju Maharaj: बिरजू महाराजांची आवडती शिष्य होती Madhuri Dixit, गुरुंना वाहिली श्रद्धांजली

Birju Maharaj: बिरजू महाराजांची आवडती शिष्य होती Madhuri Dixit, गुरुंना वाहिली श्रद्धांजली

Subscribe

नृत्य आणि अभिनयातील गुंतागुंत त्यांनी मला फार मजेदार पद्धतीने शिकवली. महाराजजी जाताना त्यांचे शोकाकूळ चाहते आणि शिष्यांना मागे सोडून गेले असले तरी त्यांनी मागे सोडलेला नृत्याचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ.

प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार बिरजू महाराजांच्या (Birju Maharaj)  निधनानंतर कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. जगभरातील महाराजांच्या निधनानंतर दुख: व्यक्त करण्यात येत आहे. बिरजू महाराजांनी सिनेविश्वातील अनेक कलाकारांना नृत्याचे धडे दिले आहेत. त्यातील एक गुणी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित ( Madhuri Dixit)  बिरजू महाराजांनी माधुरीच्या देवदास सिनेमातील गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे डान्स विथ माधुरी या कार्यक्रमात ही तिला बिरजू महाराजांचे योगदान लाभले. माधुरी स्वत: एक उत्तर कथ्थक नृत्यांगणा आहे. तिच्याकडे असलेल्या नृत्यकलेत बिरजू महाराजांचा बहुमूल्य वाटा आहे. माधुरीने देखील बिरजू महारांजाकडून नृत्याचे शिक्षण घेतले. माधुरी बिरजू महाराजांची आवडती शिष्या होती. आपल्या लाडक्या गुरुंच्या जाण्याने माधुरीने देखील दुख: व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माधुरीने बिरजू महाराजांसोबतचा तिचा एक सुंदर फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. माधुरीने म्हटले आहे, ‘ते फार महान होते पण त्यांच्यात एका लहान मुलाची निरागसता होती. ते केवळ माझे गुरू नव्हते तर माझे चांगले मित्र देखील होते. नृत्य आणि अभिनयातील गुंतागुंत त्यांनी मला फार मजेदार पद्धतीने शिकवली. महाराजजी जाताना त्यांचे शोकाकूळ चाहते आणि शिष्यांना मागे सोडून गेले असले तरी त्यांनी मागे सोडलेला नृत्याचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ. नृत्यासोबतच तुम्ही विनम्रता, शौर्य, दया शिकवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद… कोटी कोटी प्रणाम’

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

बिरजू महाराजांची आवडती शिष्य होती माधुरी

पंडीत बिरजू महाराज आणि माधुरी या गुरू शिष्याच्या जोडीत एक खास नाते होते. माधुरी बिरजू महाराजांची फार आवडती शिष्य होती. बिरजू महाराजांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘माधूरी दिक्षित माझी फार आवडती शिष्या आहेत. ती मला गुरूसमान मानते. आजही ती मला फोन करते आणि तुम्ही मुंबईत कधी येणार असे विचारते. तिला नेहमी वाटते मी कधीही मुंबईत आलो तर संध्याकाळचा वेळ तिच्यासोबत घालवाव’.

- Advertisement -

माधुरीसाठी कथ्थकचे प्रतीक होते बिरजू महाराज

माधुरी बिरजू महाराजांचा खूप आदर करायची. तिने म्हटले होते, ‘महाराजजींचा सेंस ऑफ ह्यूमर फार कमाल होता. ते नेहमी जगभरातील त्यांच्या प्रवासाचे किस्से आम्हाला ऐकवत. त्यांनी जेव्हा ‘काहे छेड छेड मोहे’ या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते तेव्हा ते मुद्रा, अभिनय, बॉडी लॅग्वेज इतक्या सुंदर आणि सहजतेने दाखवायचे तेव्हा मला मी सेटवर नाही तर स्वर्गात असल्यासारखे वाटायचे. त्यांची कला ही इंद्रधनुष्यासाखी सप्तरंगी होती ज्यात नऊ रस भरले होते. ते खूप प्रेरणादायी आणि त्यांचा तो प्रवास कधीही संपूच नये असे वाटायचे. माझ्यासाठी ते कथ्थकचे प्रतीक आहे आणि तेच नृत्य आहे’. माधुरीच्या अनेक आयकॉनिक गाण्यांमध्ये बिरजू महाराजांचा मोलाचा वाटा आहे. माधुरीच्या ‘काहे छेड छेड मोहे’ आणि ‘डेढ इश्किश’ सिनेमातील ‘जगावे सारी रैना’ या गाण्यांवर महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केले होते.


हेही वाचा – Birju Maharaj: नृत्यगुरू हरपले! बिरजू महाराजांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -