घरताज्या घडामोडीBirju Maharaj: नृत्यगुरू हरपले! बिरजू महाराजांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा

Birju Maharaj: नृत्यगुरू हरपले! बिरजू महाराजांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा

Subscribe

नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या आदरस्थानी होते. त्यांच्या जाण्याने अनेक स्थरातून त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

कथ्थक नृत्यगुरू पंडीत बिरजू महाराज यांचे सोमवारी दिल्लीत वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या आदरस्थानी होते. त्यांच्या जाण्याने अनेक स्थरातून त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

- Advertisement -

भारतीय नृत्यकलेला जगभर ओळख निर्माण करून देणारे पंडीत बिरजू महाराज यांच्या जाण्याने अत्यंत दुख: झाले. त्यांच्या जाण्याने कला विश्वास कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. दुख:च्या या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. ओम शांती! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

- Advertisement -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.  पंडित बिरजू महाराज यांनी आपले  संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगीकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ट स्नेह होता. अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना संवेदना.  –राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र  
 

जेव्हा पासून मी कथ्थक शिकतेय तेव्हा पासून कथ्थक म्हणजे बिरजू महाराज हे गणित माझ्या डोक्यात फिक्स झाले होते. महाराजांचने अनेक वर्क शॉप्स मी केले आहेत. त्यामुळे त्यांना फार जवळून पाहिले आहे. सकाळीच त्यांच्या जाण्याची बातमी आली आणि फार मोठा धक्का बसला आहे. माझ्यासाठी कथ्थकसाठी अनेक गुरू आहेत मात्र बिरजू महाराजांना मी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्याकडे नृत्याचे धडे घेतल्याने कथ्थकमधील लास्य अंग आणि त्याची सुंदरता मला महाराजांकडून शिकता आली. एक गुरू म्हणून त्यांना आम्ही पाहत आलो आहोत. आमच्यासाठी ते पाठीचा कणा होते.

फुलवा खामकर, नृत्य दिग्दर्शिका

महान कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराज जी यांच्या निधनाची दुख: बातमी ऐकली. मी त्यांची अद्वितीय प्रतिमा पाहिली आहे. त्यांना त्यांच्या नृत्यातून अनेक पिढ्या घडवल्या. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अदनान सामी – गायक

आज भारतीय संगिताची लय थांबली. सूर शांत झाले. भाव शून्य झाले. कथ्थकचे सरताज पंडीत बिरजू महाराज आपल्यात राहिले नाही. कालिकाबिंदादीन यांची गौरवशाली परंपरा जगभरात प्रसिद्ध करणारे पंडीत बिरजू महाराज अनंतात विनील झाले. – मालिनी अवस्थी – गायिका


हेही वाचा –  Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराजांचे निधन,वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -