घरताज्या घडामोडीअमूलकडून Pushpa चं क्यूट कौतुक; अल्लू अर्जुन म्हणे, Allu to Mallu to...

अमूलकडून Pushpa चं क्यूट कौतुक; अल्लू अर्जुन म्हणे, Allu to Mallu to Amallulru Arjun

Subscribe

अमूल नेहमीच ट्रेंडिंग टॉपिकवर मजेशीर कार्टून्स तयार करत असते. यावेळी पुष्पाला ट्रिब्यूट देणाऱ्या कार्टूनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाची चर्चा आहे ती म्हणजे पुष्पा (Pushpa) अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.  तर दुसरीकडे डेरी ब्रँड असलेल्या अमूल इंडियाने (Amul India) पुष्पा सिनेमाला ट्रिब्यूट देणारी एक क्यूट जाहिरात बनवली आहे. अमूल नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर काही कार्टून तयार करत असते. पुष्पाला ट्रिब्यूट देणाऱ्या जाहिरातीत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचे सुपरक्यूट कार्टून बनवले आहे. देशात अनेक ठिकाण अमूलची नवी जाहिरात पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांना ही जाहिरात भलतीच आवडली आहे. अमूलच्या या सूपरक्यूट जाहिरातीवर अभिनेता अल्लू अर्जुनने कमेंट केली असून ती प्रचंड व्हायरल झाली आहे.

- Advertisement -

अल्लू अर्जुने कमेंट करत अमूल आणि टीमचे आभार मानले आहेत. अल्लूने कमेंटमध्ये लिहीले आहे की, ‘Allu to Mallu to Amallulru Arjun’, अमूल नेहमीच ट्रेंडिंग टॉपिकवर मजेशीर कार्टून्स तयार करत असते. यावेळी पुष्पाला ट्रिब्यूट देणाऱ्या कार्टूनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे अँमेझॉन प्राइमने देखील अमूलची जाहिरात शेअर करत म्हटले आहे, ‘हे नुसते फ्लेवर बटर नाही फायर बटर आहे’. अमेझॉनचे हे ट्विट देखील प्रचंड व्हायरल होत आहे.

पुष्पा हा सिनेमा 17 डिसेंबरला रिलीज झाला. सिनेमाने आतापर्यंत 300 करोडहून अधिक कमाई केली आहे. पुष्पा हा सिनेमा लाल चंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे. सिनेमाची गाणी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आहेत. केवळ प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड कलाकारांनी देखील अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने प्रेक्षकांची मने जिंकली त्याचप्रमाणे सिनेमातील समांथाच्या एंट्रीने तर प्रेक्षकांना घायाळ केले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – Pushpa The Rise : ३०० कोटींचा गल्ला जमवणारा ‘पुष्पा’ आता ओटीटीवर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -